आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-प्रकरण सातार्‍यातील; पण पुण्यात शस्त्रक्रिया.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

प्रकरण सातार्‍यातील; पण पुण्यात शस्त्रक्रिया.

सातारा : सातारा जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर काही वर्षांपूर्वी कार्यरत असताना महिला सहकार्‍यांचे लैंगिक शोषण करीत असल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच पुणे येथीलआरोग्य विभागातील औषध खरेदी प्रकरणातही सहभागाची चर्चा झाली होती. आता पुणे महानगरपालिकेत आरोग्य अधिकारी पदावर असताना निलंबित केल्यामुळे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी थेट आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बेकायदा टेंडर प्रकरणी निलंबित केल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्यामुळे ‘भगवान के घर देर है, लेकीन अंधेर नहीं’ याची प्रचिती येत आहे. राज्य शासनाच्या विरोधात थेट आरोप करणारे पवार हे तिसरे अधिकारी ठरले आहेत.
महाराष्ट्र शासनाचा आरोग्य, शिक्षण, बांधकाम व सामाजिक न्याय विभाग, त्यानंतर पोलीस व महसूल विभागात चांगली पोस्टिंग मिळावी, म्हणून अनेकजण राजकीय नेते, मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ अधिकार्‍यांना खूष ठेवत असतात. त्यामुळे अनेकांना कर्तव्यापेक्षाही वशिलेबाजीने पदे मिळतात. वास्तविक पाहता आरक्षण व बिंदू नामावली, पदोन्नती हे शब्द जरी कायदेशीर व्यवहारात असले तरी अनेकदा वशिला कामी येतो. पण सध्या पुणे महानगरपालिकेतील डॉ. पवार यांचे राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने निलंबन केले आहे. याबाबत आता मंत्री व वरिष्ठ अधिकारी असा वाद पेटलेला आहे. या वादामागे राजकीय नेतेसुद्धा आहेत.
साताऱ्यात महिला कर्मचार्‍यांचा लैंगिक छळ व आर्थिक घोटाळ्याचे कारण पुढे करुन पुणे येथे कार्यरत असताना डॉ. पवार यांना निलंबित केले . पण, त्यांनी मॅट मध्ये जावून पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता. त्यामुळे दुखावलेल्या आरोग्य मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यातून पुन्हा निलंबनाची कारवाई झाल्याने डॉ. पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करुन आरोग्य मंत्र्यांनी नियमबाह्य टेंडर काढण्यासाठी दबाव टाकला, त्या दबावाला बळी न पडता नियमाप्रमाणे टेंडर स्विकारल्यामुळे पदाचा गैरवापर करुन आरोग्य मंत्र्यांनी बदली व निलंबन केल्याचा आरोप डॉ. पवार यांनी केला आहे.
हे पत्र शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स अकाऊंट वर शेअर केले आहे. आरोग्य विभागात रुग्णवाहिका खरेदीमध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणार्‍या भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता आरोग्य अधिकार्‍यांना नांग्या मारण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आरोग्य खात्याला पोखरणार्‍या मंत्र्याला पाठीशी घालू नये, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक शासकीय रुग्णालयात खरेदी करण्यात आलेले साहित्य एकतर धूळ खात आहे, किंवा निकामी झाले आहे. त्याबाबत आरोग्य मंत्री म्हणून आढावा घेणे गरजेचे असताना टेंडर प्रक्रियेमध्ये थेट आरोग्य मंत्र्यांचा उल्लेख होत असल्याने महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्याचे पालक तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असताना आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. भगवान पवार यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या विरोधात आरोग्य मंत्र्यांनी निलंबनाची कारवाई केल्याने अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट समोरासमोर उभे ठाकले आहेत.
मुंबईत होणार्‍या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटणार असून अधिकारी वर्ग थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करु लागलेले आहेत. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी गो. रा. खैरनार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांढरे यांनी मंत्र्यांविरोधात आवाज उठवला होता. त्याचा फायदा राजकीय मंडळींनी घेतला. आता सत्तेत सर्वजण असल्यामुळे डॉ. भगवान पवार यांनी केलेल्या आरोपाची चौकशी व आरोग्य मंत्र्यांना पदमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते किती आक्रमक होतील, यावर बरेच काही अवलंबून आहे. या टेंडर प्रक्रियेमध्ये ठेकेदार नामानिराळे झाले असून राजकीय धुळवड मात्र सुरु झाली आहे. असे मानण्यात येत आहे. महाराष्ट्र सिव्हिल सेवा (कलम३) १९७९ या नियमाप्रमाणे डॉ. पवार यांनी उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. दरम्यान, याबाबत डॉ. पवार व आरोग्य मंत्री यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button