ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जिल्हा परिषदेमध्ये विविध संवर्गाचे ९७२ पदांची मेगा भरती.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

सातारा जिल्हा परिषदेमध्ये विविध संवर्गाचे ९७२ पदांची मेगा भरती.
सातारा दि: सातारा जिल्हा निवड समितीच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदाच्या पद भरती बाबत पात्र उमेदवारांकडून दिनांक ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर परीक्षेबाबत शैक्षणिक
अहर्ता ,वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ,अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती याबाबत सविस्तर माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे .उमेदवारांनी या
(www.zpsatara .gov.in )
या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक पदाच्या शैक्षणिक पात्रते नुसार अर्ज सादर करावेत. सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून प्रस्तुत परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क तसेच माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ केले आहे.
आरोग्य पर्यवेक्षक-१ आरोग्य सेवक पुरुष४० % ७६, आरोग्य सेवक पुरुष ५०% हंगामी फवारणी कर्मचारी १७०, आरोग्य सेवक महिला -३५३, औषध निर्माण अधिकारी-३५ कंत्राटी ग्रामसेवक 101१०१ स्थापत्य व ग्रामीण पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता३२ 32 कनिष्ठ आरेखक -२, कनिष्ठ लेखा अधिकारी- ४ प्रशासन कनिष्ठ सहाय्यक -६९ ,लेखा कनिष्ठ सहाय्यक- ७, पर्यवेक्षक -३, पशुधन पर्यवेक्षक -४२ प्रयोगशाळा तंत्रज्ञ -४, प्रशासन वरिष्ठ सहाय्यक -२, लेखा वरिष्ठ सहाय्यक -१०, कृषी विस्तार अधिकारी- १ शिक्षण विस्तार अधिकारी -२ सांख्यिक विस्तार अधिकारी -५, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -५२ अशा एकूण ९७२ पदासाठी ही मेगा भरती होत आहे. दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू व अंतिम दिनांक २५ ऑगस्ट२०२३ परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट आहे . परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या सात दिवस अगोदर असणार आहे. उमेदवारांना अर्ज भरताना काही समस्या उद्भवल्यास 1800 222 366 व 18001034566 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. सरळ सेवा भरती करता विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी बाबत 0 21 62 295 0 53 संपर्क साधावा असेही सांगण्यात आलेले आहे. या संकेत स्थळावर https//ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

————————&——————–&—— ,
,.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button