पुणे :-पंच्याहत्तर फूटी उंच तिरंगा दिव्यांग रफीक खान फडकवणार……
प्रतिनिधी रफिक शेख पुणे :-9021132121

पंच्याहत्तर फूटी उंच तिरंगा दिव्यांग रफीक खान फडकवणार……
पुणे, दि. 11 (रफिक शेख ) :- आघाडीच्या अमृत महोत्सव निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वतः दोन्ही पायांनी १००% दिव्यांग असणारे शासकीय दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीचे विशेष सदस्य, प्रहारचे प्रसिद्धी प्रमुख व पॅरा टार्गेट शुटिंगचे अध्यक्ष रफीक खान हे फडकवणार असल्याचे समजले.
आपल्या घराच्या गच्ची वर तब्बल ७५ पायऱ्या आपल्या हाताच्या साह्याने चढून जमिनीपासून ७५ फूट उंच तिरंगा स्वत फडकवणार असून केंद व राज्य सरकार दिव्यांगाच्या मागण्या व राजकीय आरक्षण विषय गांभीर्याने विचार करावे. आम्ही समाजाचे घटक आहोत आमच्या भावनांचा सामान्य नागरिकांनी भान ठेऊन समाजाच्या मुख्य प्रहवात सामील करावे अशी त्यांची मागणी आहे.
तसेच देशाच्या प्रत्यक एअरपोर्ट वर १०० फूट उंच तिरंगा असावा त्या अनुषंगाने त्यांनी पुणे एअरपोर्ट वर तिरंगा उभारण्यात यावा यासाठी ७ महिन्यापूर्वी निवेदन दिले होते पण प्रतिसाद न मिल्यामुळे एअरपोर्ट वर रक्तदान करून आंदोलन करू असे पत्र देताच सदर विषय एअरपोर्ट खात्याने विचारात घेऊन परवानगी मागितली. मागच्या आठवड्यात ऐरफोर्स खात्याने २४.९ मीटर उंच तिरंगाची परवानगी दिली. या अशाप्रकारे लवकरच पुणे शहराच्या वैभावात भर पडून एअरपोर्ट वर उंच तिरंगा फडकेल.
त्याचप्रमाणे येरवडा येथील सेंट्रल जेल च्या मुख्य प्रवेश द्वारावर १०० फूट उंच तिरंगा त्याच्या प्रयत्नातून फडकवणार आहे. तिरंगी हा आपल्या देशाचा अभिमान आहे व त्याचा आदर, प्रेम,स्नेह आणि गरिमा प्रत्येक नागरिकच्या मनात असावी त्यासाठी मोठ मोठे सरकारी कार्यलयात, रेल्वेस्टेशन, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ऐतिहासिक ठिकाण, एअरपोर्ट इतर सार्वजनिक ठिकाणी १०० फूट उंच तिरंगा उभारावा अशी विनंती रफिक खान यांच्या सह नागरिकांकडून केली जात आहे.