आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:मिनी काश्मीर तापोळा गावच्या पद्मावती देवी यात्रेचा पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

तालुका महाबळेश्वर:मिनी काश्मीर तापोळा गावच्या पद्मावती देवी यात्रेचा पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न.

५० व्या यात्रेने परंपरा, श्रद्धा आणि संघटनशक्तीचा अभिमानास्पद जयघोष.

महाबळेश्वर तालुक्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा गावात यावर्षी पद्मावती देवीच्या सुवर्ण महोत्सवी ५० व्या यात्रेचा सोहळा अभूतपूर्व, नेत्रदीपक आणि संस्मरणीय स्वरूपात साजरा करण्यात आला. गावाच्या कणाकणात भक्ती, शिस्त आणि परंपरेचा दरवळ पसरलेला दिसून आला.

ग्रामस्थ मंडळ तापोळा, व्यापारी मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ, महिला मंडळ व राजा शिवछत्रपती मंडळ तापोळा यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा सुवर्ण महोत्सव अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
सकाळी ७ वाजता पद्मावती देवीचा विधिवत अभिषेक होऊन धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत देवीची पालखी संपूर्ण गावात फिरवण्यात आली. प्रत्येक घरातून ओसंडून वाहणारी श्रद्धा आणि भक्तिभाव हे यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.

यानंतर माहेरवासिनींसाठी पारंपरिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
रात्री १२ वाजता छबिना व भव्य मिरवणूक विद्युत रोषणाईत काढण्यात आली. रोषणाईने उजळलेला तापोळा गाव पाहता हा सोहळा सुवर्ण महोत्सवाला शोभेल असाच ठरला.

पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. रात्रभर आर्केस्ट्रा व तमाशांचे कार्यक्रम रसिकांच्या गर्दीत रंगले.

या संपूर्ण यात्रेला भव्यतेचा साज चढविण्यासाठी अंकित मंडप डेकोरेशन, प्रोप्रायटर अशोक पवार (लाकवड, मुंबई) यांनी केलेली उत्कृष्ट मंडप सजावट व भव्य विद्युत रोषणाई सर्वत्र चर्चेचा विषय ठरली.

या सुवर्ण महोत्सवी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी गावचे सरपंच, पोलीस पाटील, विविध मंडळांचे पदाधिकारी, महिला, तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थांनी अत्यंत शिस्तबद्ध व एकसंध सहभाग नोंदवला.

उद्या दुपारी भव्य दिव्य कुस्त्यांचा फड, वमानाची गद्या तसेच जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून, या फडाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

परंपरा जपताना भव्यतेचा नवा मानदंड निर्माण करणारा तापोळ्याचा सुवर्ण महोत्सव हा संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button