वाई:- किसन वीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वाईच्या एल.आय.सी.शाखेस भेट.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि.26
किसन वीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची
वाईच्या एल.आय.सी.शाखेस भेट.
किसन वीर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्यावतीने बी. कॉम. भाग १ मधील “विमाकौशल्य” हा विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एल. आय. सी. शाखा वाई या ठिकाणी अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती.
बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता त्यांना प्रत्यक्ष कार्याची ओळख व्हावी, या हेतूने ही अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती.
एल. आय. सी. वाई शाखा प्रबंधक श्री. शिवा पटनाईक यांनी विद्यार्थ्यांना आयुर्विमा क्षेत्रातील करियरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन केले. तसेच उपशाखा प्रबंधक श्री. अजित बोराटे यांनी विद्यार्थ्यांना आयुर्विमा उतरविण्याची कार्यपद्धती, मृत्युदावे, वारस नोंद, विमेदाराचे हक्क व अधिकार, आयुर्विमा पॉलिसीचे विविध प्रकार व फायदे इत्यादि अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विकास अधिकारी श्री. अमरनाथ अनुसे यांनी शाखेतील विविध विभाग व त्यांची कार्यपद्धती मुलांना प्रत्यक्ष समजावून सांगितली. या भेटीचे नियोजन श्रीमती रेखा भोसले यांनी केले. श्रीमती श्रुती यादव यांचे विशेष सहकार्य लाभले.