आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-“जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले” हे ब्रीद वाक्य घेऊन रयत स्वाभिमानी संघटनेचे अविरत कार्य.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले” हे ब्रीद घेऊन रयत स्वाभिमानी संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 23 जुलै 2023 सातारा जिल्हा खंडाळा तालुका येथे रयत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक सूर्यकांत सरोदे यांच्या आदेशाने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लाटी काटी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आजच्या या परिस्थितीत महिलांच्या संरक्षणाच्या  दृष्टीने महिलांना मोफत लाटी काटी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरू केले. आज दिनांक २३/०७/२०२३ पासुन दर रविवारी खंडाळा येते प्रशिक्षण देण्यास सुरुवात केले आहे. प्रशिक्षण रोहित कांबळे सर देत आहेत.
23 जुलै पासून सुरू केलेला हा लाटी काटी उपक्रम कायम स्वरुपी असून सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे कार्याध्यक्ष संदीप जाधव यांनी यावेळी सांगितले.

युवती जिल्हा अध्यक्षा सपना ताई भोसले यांनी पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये  लाटी काटी प्रशिक्षण देण्यास सुरुवात करू असे सांगितले.
यावेळी रयत स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ कदम, महिला आघाडीच्या स्वातीताई माने, संघटनेचे जिल्हा सचिव अभय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रवक्ता आयु. संदीपभाऊ जाधव, कार्याध्यक्ष वंदनाताई पवार, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गुंजवटे, युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सपनाताई भोसले, रयत स्वाभिमानी संघटना जिल्हा सरचिटणीस निहाल इनामदार, जिल्हा संघटक अविनाश दडस, जिल्हा उपाध्यक्ष सुमितभाऊ साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष आदित्य चौधरी, कामगार आधाडी जिल्हा उपाध्यक्ष कार्तिक धमाळ, युवती जिल्हा उपाध्यक्ष प्रमिला यादव, खंडाळा महिला तालुका उपाध्यक्ष वैशाली फडतरे,कामगार महिला आघाडी तालुका अध्यक्ष सपना खंडागळे, खंडाळा तालुका अध्यक्ष सपना खंडागळे, कामगार आघाडी महिला तालुका उपाध्यक्ष सुनिता अहिरेकर, खंडाळा तालुका अध्यक्ष राम जाधव, वनिता शेलार, मयुरी चव्हाणयोगेश साळुंखे, दीपक कणसे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button