सातारा:-खरीप हंगामासाठी हमीभाव जाहीर:- अनिलकुमार कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
खरीप हंगामासाठी हमीभाव जाहीर:- अनिलकुमार कदम.
स्थैर्य/गिरवी/ दिनांक:- १४/०८/२५
केंद्र सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या किमान आधारभूत किमती (MSP) म्हणजेच हमीभाव जाहीर केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य मोबदला मिळण्याची खात्री मिळाली आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी दिली आहे.
पीक प्रति क्विंटल हमीभाव व वाढ (रुपयांमध्ये) खालील तपशीलवार प्रमाणे जाहिर करण्यात आले आहेत.
(१) सोयाबीन ₹५,३२८ ₹४३६
(२)कापूस (मध्यम) ₹७,७१० ₹५८९
(३)कापूस (लांब) ₹८,११० ₹५८९
(४)तूर ₹८,००० ₹४५०
(५)मका ₹२,४०० ₹१७५
(६) ज्वारी (हायब्रीड) ₹३,६९९ ₹३२८
(७) ज्वारी (मालदांडी) ₹३,७४९ ₹३२८
(८) भात (सामान्य) ₹२,३६९ ₹६९
(९) भात (ए-ग्रेड) ₹२,३८९ ₹६७
(१०)बाजरी ₹२,७७५ ₹१५०
(११)रागी ₹४,८८६ ₹५९६
(१२)मूग ₹८,७६८ ₹८६
(१३)उडीद ₹७,८०० ₹४००
(१४)भुईमूग ₹७,२६३ ₹४८०
(१५)सूर्यफूल ₹७,७२१ ₹५७९
(१६) कारळे ₹९,५३७ ₹८२०
सोयाबीन: हमीभावात प्रतिक्विंटल ४३६ रुपयांची वाढ झाली असून, नवा दर ₹५,३२८ इतका आहे.
कापूस: मध्यम धाग्याच्या कापसासाठी ₹५८९ ची वाढ होऊन नवा दर ₹७,७१० झाला आहे, तर लांब धाग्याच्या कापसाला ₹८,११० चा दर मिळेल.
तूर: तुरीच्या हमीभावात ₹४५० ची वाढ झाली असून, आता तो ₹८,००० इतका असेल.
मका: मक्याच्या हमीभावात ₹१७५ ची वाढ झाली असून, तो आता ₹२,४०० झाला आहे.
शेतीच्या पिकांचे उत्पादन खर्चात वाढ झाली असून जाहिर केलेल्या हमी भावा प्रमाणे बाजारात दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने सर्व खाजगी, निमसरकारी, मार्केट यार्ड, व्यापारी यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान हमी भावा प्रमाणे खरेदी करण्यासाठी निर्बंध घातले तरच शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल अन्यथा येरे माझ्या मागल्या सारखी अडचणीची स्थिती निर्माण होईल अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.