खंडाळा:-(सातारा)-नागरी सुविधा केंद्र सेतू तहसिल खंडाळा प्रगतीकडे वाटचाल..
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
नागरी सुविधा केंद्र सेतू तहसिल खंडाळा प्रगतीकडे वाटचाल..
खंडाळा (सातारा) – राज्य सरकारने सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी विविध सरकारी दाखले सेतू कार्यालयांमार्फत देण्याचा निर्णय घेतला. त्या प्रक्रियेत तालुक्यातून प्रत्येक नागरिकास विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र जलद गतीने तसेच भ्रष्टाचार न होता अचूकपणे खंडाळा तालुक्यातील नागरी सुविधा केंद्राने केले आहे. त्यामुळे खंडाळा तालुका तहसिलदार श्री. अजित पाटील, नायब तहसिलदार श्री. स्वप्निल खोल्लम, निवासी नायब तहसिलदार श्री. हेमंत कामत तसेच सर्व महसूल सहाय्यक अधिकारी कर्मचारी वर्गाचे कौतुक नागरिकांमधून होत आहे.
लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत सेतू कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, नॉन क्रीमिलेअर, जात प्रमाणपत्र, जात प्रमाण प्रतिज्ञापत्र, शेतकरी प्रमाणपत्र, ३० टक्के महिला आरक्षण, एसईबीसी तसेच इतर प्रकारचे दाखले देण्याचे कार्य होते. त्यासाठी सरकारने तालुक्यातील सेतू सुविधा केंद्रांना परवानग्या दिलेल्या आहेत.कोणत्या कामासाठी किती शुल्क आकारायचे यासंदर्भातला फलक प्रत्येक सेतू केंद्राच्या दर्शनी भागात लावण्याबाबत सक्ती केली आहे. या सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करून खंडाळा तहसिलदार व नागरी सुविधा केंद्र सेतू चालक कर्मचारी वर्गाने अभिमानास्पद कार्य चालू ठेवले आहे.
मुलांच्या शैक्षणिक प्रवेशांसाठी दाखले वेळेत मिळावेत, यासाठी सेतू कार्यालयांमधून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी वारंवार सर्वर डाऊन किंवा विविध अडचणी येऊन सुद्धा खंडाळा सेतू कर्मचारी वर्गाने सर्व गोष्टी महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे पार पाडून काम चालू ठेवले आहे ते कौतुकास्पद आहे याची चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये होत आहे.