ताज्या घडामोडी

साताऱ्यात शिवसैनिकांसोबत माजी सैनिक प्रचाराच्या रणांगणात…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यात शिवसैनिकांसोबत माजी सैनिक प्रचाराच्या रणांगणात…

सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्हा हा सेना दलातील जवानांसाठी जगप्रसिद्ध आहे. याच सैनिकातून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची खूप मोठी संघटना असून त्यापैकी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांसोबत माजी सैनिक सुद्धा राजकीय रणांगणात उतरले आहेत.
आज साताऱ्यात शिवसेना नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हा माजी सैनिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष श्री. मनोज कुमार डांगे- सूर्यवंशी व निलेश निकम, इंद्रजीत भिलारे, सो भारती बर्गे, सौ .उर्मिला पवार, संजयकुमार निंबाळकर व आप्पा पडवळ, सचिन साबळे, शंकरराव खापे ,शांतीलाल होळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज साताऱ्यात माजी सैनिकांचा मेळावा झाला.
यावेळी महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या प्रश्नासोबतच सातारा जिल्ह्यातही माजी सैनिक विकास कामांमध्ये योगदान देतील. त्यामुळे त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विचार व्हावा. अशी जोरदार मागणी करण्यात आली.एक तरी माजी सैनिक सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पाठविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दया. असे आवाहन श्री डांगे सूर्यवंशी यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी स्वतःचे देश प्रेमी सोबतच आता राजकीय अस्तित्व दाखवून देणे गरजेचे आहे. सर्वांनी एकमेकांना ताकद दिली पाहिजे. आपण देशाच्या सरहद्दीवर लढणारे सैनिक आहोत. सर्व जातीतील समाज एक होतो. आता देशाच्या सरहद्दीवर लढणाऱ्या माजी सैनिकांनी आपापल्या गावात एक झाले पाहिजे.
विधानसभेच्या निवडणुकीत घोडा व मैदान जवळ आहे. कोरेगाव, पाटण, सातारा – जावळी शिवसेना उमेदवार निवडून देण्यासाठी माजी सैनिकांनी प्रयत्न करावा असे स्पष्ट केले .
या वेळेला माजी सैनिक संपत गीते, प्रवीण शिंदे, हनुमंत जगताप व सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा परिसरात जय जवान… जय किसान… जय शिवाजी महाराज, जय महाराष्ट्राचा नारा देण्यात आला. प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच माजी सैनिकांना आघाडीच्या विविध पदावर टाळ्यांचा कडकडाट्सह नियुक्ती देण्यात आली.
————————————

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button