ताज्या घडामोडी

वाई:- भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवितात: अभिषेक सावेकर.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

RPS STAR NEWS

वाई दि.30
भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवितात: अभिषेक सावेकर.

वाई ग्रामीण भागातील विद्यार्थी हे अतिशय हुशार असतात, परंतु मुलाखतीवेळी केवळ मुलाखत तंत्र अवगत नसल्यामुळे ज्ञान असूनही त्यांची निवड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी मुलाखतीसाठी जाण्याअगोदर तयारी केली पाहिजे.विविध भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत असे प्रतिपादन मॅजिक बस इंडिया फौंडेशनचे प्रशिक्षक श्री.अभिषेक सावेकर यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत आयोजित १० दिवसीय रोजगारक्षमता कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्धघाटनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.हणमंत कणसे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.(डॉ.) डी. एन. झांबरे, डॉ. संदीप वाटेगावकर, दीपाली पाटील यांची उपस्थिती होती.
सावेकर पुढे म्हणाले, या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीसाठी लागणारी सर्व कौशल्ये; यामध्ये बायोडाटा, मुलाखत तंत्र, संभाषण कौशल्य, कलचाचणी या सर्व गोष्टीची तयारी करून घेतली जाणार आहे तसेच या सर्टिफिकेट कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असे त्यांनी आश्वासित केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून आपला आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. या कार्यशाळेत अनेक कौशल्ये आपल्यामध्ये विकसित केली जातील तसेच या माध्यमातून जो बदल विद्यार्थ्यांमध्ये होईल त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी होणार आहे. कंपनीला आवश्यक असणाऱ्या सर्व कौशल्यांचे ज्ञान आणि उपयोजन हे या प्रशिक्षण कार्यशाळेत दिले जाणार आहे.
प्रास्ताविकामधे प्रा.(डॉ.) झांबरे यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करीत नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा कशी उपयुक्त आहे हे सांगितले.
पाहुण्यांचा परिचय रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ संदीप वाटेगावकर यांनी करून दिला. अक्षदा संकपाळ व ऋतुजा भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ सानप यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राजेश्वरी कामटे, मंजिरी पिसाळ, प्रियांका जाधव, निकिता सुर्वे, अजित पांढरे, धनश्री शिर्के तसेच भास्कर घोणे, अनिल सावंत, अनिल शेलार, अनिल लाखे, अनिल बोडरे, दत्ता काळे चेतन तावरे, किशोर पिसाळ, शुभम पिसाळ यांनी परिश्रम घेतले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button