आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-शरद दुधाट यांना पी एच डी प्राप्त.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
लोहगाव (वार्ताहर) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने शरद भाऊसाहेब दुधाट यांना नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी प्राप्त झाली आहे.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख शरद भाऊसाहेब दुधाट यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी प्रदान केली आहे. त्यांनी “अंतर्नाद या नियतकालिकातील कथांचा चिकित्सक अभ्यास (प्रारंभ ते २००५)” या विषयावर प्रा. डॉ. शिरीष लांडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास प्रबंध सादर केला होता.
या यशाबद्दल मीनाताई जगधने, रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, प्रकाश निकम पाटील, विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, डॉ. राजीव शिंदे, अंतर्नाद’चे संपादक भानू काळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई, प्रा. डॉ. श्रीकृष्ण काकडे, मार्गदर्शक प्रा. डॉ. शिरीष लांडगे पाटील, प्राचार्य नानासाहेब शेळके, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. कुंडलिकराव शिंदे, प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे, प्राचार्य बाबासाहेब वमने, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, प्र. प्राचार्य डॉ. प्रवीण बडदे, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य डॉ. श्रीरंग झावरे, प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, डॉ. सौ. उज्ज्वला भोर, डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. बाळासाहेब शेळके, डॉ. महाले, डॉ. संतोष पवार, डॉ. सौ. योगिता रंधावणे, सुजाता पोखरकर, सुखदेव सुकळे, प्रा. डॉ. जयंत गायकवाड, डॉ. राजेंद्र मगर, जगन्नाथ काकडे, कोंडीराम नेहे आदींनी अभिनंदन केले आहे.