पॅरा टार्गेट शुटिंगचे अधेक्षतेखाली बालेवाडीत नेमबाजी स्पर्धा संपन्न पुणे,
प्रतिनिधि:- रफीक शेख पुणे

पॅरा टार्गेट शुटिंगचे अधेक्षतेखाली बालेवाडीत नेमबाजी स्पर्धा संपन्न
पुणे, दि. 12 (रफिक शेख) : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दिव्यांग नेमबाजी स्पर्धा बालेवाडी येथे आयोजित केली होती त्याचे उद्घाटन राज्यमंत्री मा. बच्चु कडु यांच्या हस्ते झाले.
दिव्यांग खेळाडूमध्ये नेमबाजी बद्दल जनजागृती, आवड निर्माण व्हावी व देशाला नवीन खेळाडू मिळावे तसेच दिव्यांगांच्या कौशल्याला वाव मिळावा यासाठी सदर स्पर्धा बालेवाडी स्टेडियम मध्ये आयोजित आली होती.
पॅरा टार्गेट शुटिंगचे रफिक खान यांच्या अध्यक्षतेखाली व आकाश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे महानगरपालिकेच्या सहयोगाने सदर स्पर्धा पार पडली.
नुकतेच टोकियो येथील ओलपिक मध्ये दिव्यांग नेमबाजांनी 5 पदके जिंकून आणली होती ,त्या अनुषंगाने आणखीन प्रोत्साहन मिळावा यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. विजेत्यांना ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले.