फलटण:-१५ ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनप्रेरणा स्पर्धेचे आयोजन – जयश्री तांबे.
पत्रकार अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण
RPS STAR NEWS
१५ ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनप्रेरणा स्पर्धेचे आयोजन – जयश्री तांबे.
भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. पुस्तक वाचल्याने चांगले विचार व चांगले संस्कार घडत असतात.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बाल वयातच वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे महत्त्व समजावे म्हणून आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे नेहमी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. 15 ऑक्टोबर डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या वर्षीही विद्यार्थ्यांसाठी वाचन प्रेरणा स्पर्धेचे आयोजन केले असून त्या स्पर्धेचे निकष पुढीलप्रमाणे राहतील.
सदर स्पर्धा ही राज्यस्तरीय असून दोन गटात घेतली जाणार आहे.इयत्ता १ली ते ५ वी चा एक गट व ६ वी ते १० वी चा दुसरा गट. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित कोणतेही एक पुस्तक सविस्तर वाचन करून त्या पुस्तकांमध्ये आपणाला डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे विषयी काय वाटले या विषयी ५०ते ६० ओळींमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात लेखन करून ते लेखन व वाचलेल्या पुस्तकाच्या पहिल्या पानाचा फोटो आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य या फेसबुक पेज वरती पाठवायचे आहे.
सदर माहिती पाठवत असताना स्पर्धकांनी आई-वडिलांच्या अथवा शिक्षकांच्या फेसबुक अकाउंट वरून माहिती पाठवावी. दिनांक १३ऑक्टोबर २०२४ पर्यंत आलेले पुस्तक परीक्षणच या स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. माहिती पाठवत असताना प्रथम आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य असा स्पष्ट उल्लेख करावा, त्यानंतर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, स्पर्धकाचे नाव, इयत्ता,शाळा,तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, पुस्तकाची पृष्ठ संख्या, किंमत,लिहून नंतरच पुस्तक परिचयाला सुरुवात करावी. स्पर्धेविषयी अधिक माहिती हवी असल्यास ९८९०६२८७२० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.( कृपया सकाळी १०ते ५ या वेळेमध्ये स्पर्धेसंदर्भात माहिती विचारण्यासाठी कोणीही फोन करू नये)
प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढले जातील उत्कृष्ट पुस्तक परिचयाला राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. बक्षीसाचे स्वरूप-
मानाचा फेटा,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक भेट स्वरूपात दिले जाईल. सहभागी सर्व स्पर्धांना ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल व विजेता स्पर्धकांची यादी १४ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर केली जाईल.सदर पुरस्काराचे वितरण आई प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यक्रमात केले जाईल. अशी माहिती आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरच्या सचिव सौ.जयश्री तांबे यांनी दिली.