पालघर:-श्री.अजित इंदुमती सदाशिव क्षीरसागर पलपब प्राइड ऑफ भारत पुरस्कार – 2025 ने सन्मानित.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री.अजित इंदुमती सदाशिव क्षीरसागर पलपब प्राइड ऑफ भारत पुरस्कार – 2025 ने सन्मानित.
पलपब पब्लिकेशन, अहमदाबाद, गुजरात यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय अभिजात काव्यधारा – 2025 हा कार्यक्रम सोनोपंत दांडेकर कॉलेज, पालघर येथे दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडला. पलपब पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. लीना पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पलपब पब्लिकेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. किरण तोडकर-सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र राज्यातील विविध भागांतून आलेल्या साहित्यिक, कवी, लेखक व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमावेळी विविध भागांतून, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार वितरित करण्यात आले. पलपब प्राईड ऑफ भारत पुरस्कार – 2025 हा सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार मा.श्री. अजित इंदुमती सदाशिव क्षीरसागर यांना सन्मानपूर्वक देऊन गौरविण्यात आले.
श्री. अजित क्षीरसागर यांच्या धैर्याची, कर्तुत्वाची, साहित्य सेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी केलेले कार्य उत्कृष्टता, समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. तसेच साहित्य व समाज क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या सृजनशीलतेमुळे आणि समाजहिताच्या कार्यामुळे त्यांनी आपल्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या विविध कलागुणांनी स्वतःचे व समाजाचे नाव उज्वल करणाऱ्या सामाजिक पातळीवर लौकिकास पात्र असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांची कार्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि समाज कल्याणासाठी निस्वार्थ भावना अनन्यसाधारण आहे. एकूणच त्यांचे जीवन अत्यंत अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. त्याबद्दल पलपब प्राइड ऑफ भारत पुरस्कार – 2025 हा त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार कवी आणि लेखक, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मा.डॉ.श्री. विनायक जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी लेखक मा. श्री. प्रकाश बारी, पलपब पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. संदीप पवार, पलपब पालघर जिल्हाध्यक्ष श्री. सुहास राऊत, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, ज्येष्ठ लेखिका रेखा दीक्षित, ज्येष्ठ लेखक जयवंत म्हात्रे, अभिनेत्री प्रणिता राऊत, अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे आणि श्री. दीपक सोनवणे हे उपस्थित होते. सर्व श्रोत्यांनी यावेळी राज्यस्तरीय काव्य संमेलनाचाही आस्वाद घेतला. या पुरस्काराने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांचे समाजाप्रती असणारे दायित्वाचा सन्मान करणे असा आहे. सर्व पुरस्कार कर्त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या.