आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कणेरी मठ:-रुग्ण बासरी वादन तर मेंदूची जटील शस्त्रक्रियेत डॉक्टर्स मग्न…सिद्धगिरी हॉस्पिटल अनोखा विक्रम.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS

रुग्ण बासरी वादन तर मेंदूची जटील शस्त्रक्रियेत डॉक्टर्स मग्न…सिद्धगिरी हॉस्पिटल अनोखा विक्रम.

कणेरी मठ दि:

रुग्णाची मेंदूवर जटिल शस्त्रक्रिया करत असताना रुग्णास जागे ठेवणे अत्यंत गरजेचे असते. रुग्णावर शस्त्रक्रिया करणे हि जोखमीची गोष्ट असली तरी रुग्णाच्या रुग्णाची बासुरी वाजवण्याची क्षमता नष्ट होऊ नये, यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉ. शिवशंकर मरजाक्के व त्यांच्या टीमने रुग्णास बासुरी वाजवायला सांगून दुसऱ्या बाजूने शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. मेंदू वरती शस्त्रक्रिया होत असून सुद्धा रुग्ण बासरी वादनात तर डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यात मग्न असल्याचे दिसून आलेले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठातील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल १०२ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व जोखमीच्या अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. अशा मेंदूच्या आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई, पुणे चेन्नई दिल्ली सारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात, तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के* यांनी कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये झालेल्या पत्रकार परिषेदेत केले.

पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णालयातील संस्कार (मेंदू विभाग) विभागाने मेंदूच्या तब्बल १०२ अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे. विविध शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो, पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेची गरज असते,

मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतो. जर मेंदूमध्ये एखादी गाठ झालेला रुग्ण आला तर त्याच्या सर्व क्रिया पूर्वीसारख्या होण्यासाठी मेंदूच्या संवेदनशील भागाला स्पर्श न करता ती गाठ काढली तरच ती शस्त्रक्रिया यशस्वी होते. त्यामुळे रुग्ण पूर्वीसारखा होण्यासाठी यात अत्यंत अचूकता ठेवणे गरजेचे असते.सामान्यत: अनेक मेंदूच्या शस्त्रक्रियेत पूर्णतः भूल देऊन शस्त्रक्रिया केली जाते. पण मेंदूच्या आतील एखाद्या गाठीची शस्त्रक्रिया करत असताना जर मेंदूच्या नियंत्रक भागाला इजा अथवा धक्का पोहचला तर त्याचे दुष्परिणाम म्हणून शरीरातील एखादा भागात वा नियंत्रण शक्तीला कायमचे अपंगत्व येवू शकते. त्यामुळे अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया करताना रुग्णास जागे ठेवून शस्त्रक्रिया केल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करत असताना रुग्णासोबत बोलत बोलत शस्त्रक्रिया करावी लागते. यासाठी लागणारे तंत्रज्ञान व टीम सिद्धगिरी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे.
अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेमध्ये भूल देताना केवळ मेंदूच्या प्रमुख भागात भूल देवून केवळ तोच भाग भूलीत केला जातो. अशा शस्त्रक्रियेत रुग्णास बोलते ठेवून, आरामदायक स्थिती शस्त्रक्रिया संपेपर्यंत ठेवावी लागते, हे कौशल्य व कसब केवळ न्युरो भूलतज्ञांच्याकडे असते, सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रकाश भरमगौडर हे ही जबबदारी गेली १० वर्ष यशस्वी सांभाळत आहेत. याशिवाय शस्त्रक्रिया चालू असताना इतरत्र मेंदूच्या इजा होऊ नये न्युरो मॉनेटरिंग मशीन उपलब्ध आहे. या प्रणालीमुळे मेंदूचा भागाचे नुकसान होऊ न देता शस्त्रक्रिया करणे सुलभ होते. निवडक रुग्णालयात विलंब करण्यापेक्षा रुग्णांना माहिती नसते कि, सिद्धगिरी सारख्या ग्रामीण भागात ही अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीनी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावी. जेणेकरून गरजू रुग्णांना याचा लाभ व्हावा, असे आवाहन पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले.

यावेळी डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी विविध दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे सदर जटील व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. यावेळी प्रास्ताविक विवेक सिद्ध यांनी केले तर या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, ऋतुराज भोसले , दयानंद डोंगरे व पत्रकार उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button