दहिवडी:-माण खटाव तालुक्यात गोरे- पाटील हात मिळवणी शिखर गाठणे शक्य.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
माण खटाव तालुक्यात गोरे- पाटील हात मिळवणी शिखर गाठणे शक्य.
दहिवडी दि: राजकीय दृष्ट्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माण खटाव विधानसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या ठिकाणी महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहेत. आता नाही तर पुन्हा कधीच नाही. या न्यायाप्रमाणे गोरे- पाटील हात मिळवणीने राजकीय शिखर गाठणे शक्य होईल. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
याबाबत माण- खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती विरोधात महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाले आहे. खरं म्हणजे भाजपचे आमदार जयकुमार गोरे विरुद्ध इतर राजकीय पक्ष कार्यकर्ते नेते असेच झालेले आहे. मतदार कोणासोबत हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
माण खटाव विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवायचे असेल तर दुरंगी लढत होणे जास्त गरजेचे आहे. कारण, आकडेवारी जर पाहिली तर २०१९ साली भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना ९१४६९ म्हणजेच ४०.१६ टक्के व राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी प्रभाकर देशमुख यांना ८८४२६ म्हणजे ३८.८२ टक्के व शिवसेनेचे युवा नेते शेखर गोरे यांना६७ हजार ५३९ म्हणजेच १६.४८ टक्के एवढी मते मिळाली आहेत. उर्वरित नऊ उमेदवारांना दहा ते बारा हजार मते मिळालेले आहेत. विशेष बाब म्हणजे सेना भाजप युती असताना सुद्धा भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची महायुती असून सुद्धा गोरे बंधूंसाठी माण तालुक्यामध्ये जाहीर सभा घेऊन दोन्ही नेत्यांनी आपल्या युतीचे फराकत घेण्याचे संकेत दिले होते. आता या गोष्टीला पावणे पाच वर्षे झाली आहेत . माण तालुक्यात विशेषता आंधळी गटात आ .जयकुमार गोरे यांना कमी मतदान झाले तर खटाव तालुक्यात शिवसेनेचे युवा नेते शेखर गोरे यांना मताधिक्य मिळाल्यामुळे खाट व टेबल पुन्हा एकत्र जर निवडणूक लढवली तर कमळ फुलण्यास निश्चितच यश मिळणार आहे. वास्तविक पाहता २००८ नंतर विधानसभा मतदारसंघाचे परिसिमन आदेश काढण्यात आले. त्यामध्ये माण तालुका व खटाव तालुक्यातील वडूज कातरखटाव आणि मायणी हे गट जोडले गेलेले आहेत.
राजकीय दृष्ट्या तसं पाहिलं तर माण तालुक्यामध्ये आमदार म्हणून प्रभावती शिंदे, विष्णुपंत सोनवणे, धोंडीराम वाघमारे ,तुकाराम तुपे, संपतराव अवघडे यांनी तर खटाव तालुक्यामध्ये केशवराव पाटील, भाऊसाहेब गुदगे, डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी आमदारकी भोगलेली आहे. आदरणीय ज्येष्ठ नेते सदाशिव तात्या पोळ यांना विधान परिषदेवर घेतल्यामुळे त्यांचेही आमदारकीचे स्वप्न काही अंश पूर्ण झाली होते. या विधानसभा मतदारसंघांमध्ये गेले २५ वर्ष बिगर मराठा आमदार ही शल्य अनेकांना अस्वस्थ करत आहे. परंतु दुहेरी लढत झाली तर निश्चितच आमदार जयकुमार गोरे यांना ही निवडणूक जड जाईल. यासाठी या निवडणुकीत शेखर गोरे उमेदवार असणे. हे आमदार गोरे यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. तसेच आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे अशी दुरंगी लढत झाली तरच आमदार जयकुमार गोरे यांचा पराभव होऊ शकतो. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. सध्या या मतदारसंघात माजी सनदी अधिकारी व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई , काँग्रेसचे प्रादेशिक सदस्य रणजीतसिंह देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे , शिवसेनेचे संपर्कप्रमुख शेखर गोरे व ऐन वेळच्या विषयाप्रमाणे काही नावे पुढे आली तर आश्चर्य वाटणार नाही. अशी राजकीय परिस्थिती आहे. माण व खटाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन जर घडवायचे असेल तर शेजारील उत्तर विधानसभा मतदारसंघाची ही तेवढीच मदत लागणार आहे.
सध्या माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चांगलीच पकड निर्माण केली आहे . सध्या भाजपचे मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांचेही त्यांना राजकीय चांगले आव्हान मिळालेले आहे. ते आव्हान पेलण्यासाठी गोरे- पाटील एकत्र करून फायदेशीर ठरणार आहे. याचा जातीय अर्थ जरी निघाला तरी वस्तूची तीच आहे. यामुळे दुरंगी लढत ही निर्णायक ठरणारी आहे. यामध्ये हात मिळवणे किती यशस्वी होईल याकडे आता अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत.