वाई:-शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी तालुकास्तरीय मेळावा.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि.06
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी तालुकास्तरीय मेळावा.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सातारा यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री विजय परीट, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे निरीक्षक श्री सुनील करचे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या शासनाच्या विविध शिष्यवृत्तींची सखोल माहिती श्री करचे यांनी दिली. शासनाच्या अनेक शिष्यवृत्ती असून, त्याची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठया रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते. विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीची विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने ते त्या पासून वंचित राहतात. युपीएससी व्यक्तिमत्व चाचणीकरिता दिल्ली येथे जावे लागत असल्याने त्यासाठी येणाऱ्या खर्चाकरिता अर्थसहाय्य्य दिले जाते. एम. फील, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाते.
वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री परीट म्हणाले, विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाणीव असणे गरजेचे आहे. परिश्रम घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही.
उपप्राचार्य प्रा.(डॉ.) कांबळे म्हणाले, शासन अनेक योजना घेऊन महाविद्यालयामध्ये आले आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य प्रा.(डॉ.) झांबरे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेऊन शासनाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. विद्यार्थ्यांच्या हिताच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, त्या करण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असणारा आळस झटकून प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. शिष्यवृत्ती केवळ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नसून त्या सर्वांसाठी आहेत, त्याची माहिती विद्यार्थ्यांनी घ्यावी.
या कार्यक्रमासाठी ओबीसी महामंडळाचे श्री विकास सावंत, वसंतराव नाईक महामंडळाचे श्री प्रदीप सावंत, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी, महाविद्यालयाच्या समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा.(डॉ.) भानुदास आगेडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री सावंत सर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. अर्जुन जाधव यांनी केले.