
मनोज माळी यांचे प्रहार आमरण उपोषण
कराड व पाटण तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील असुविधा विरोधात आमरण उपोषण.
आपण कराड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध सोयी व सुविधा लोकांना वेळेत मिळणे बाबत तसेच शासकीय कर्मचारी तथा वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर यांची त्यामुळे कमतरता असल्यामुळे गरीब व इतर रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही तसेच सामान्य लोकांना बाहेरील खाजगी हॉस्पिटल मधून औषध उपचार घेणे परवडत नाही यांचा सारासार विचार करून आपण या उपजिल्हा रुग्णालयात विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा जसे एम आर आय मशीन सिटीस्कॅन ट्रमा केअर युनिट या सेवा मिळत नाहीत बेडची संख्या कमी असल्यामुळे लोकांना बाहेरील खाजगी हॉस्पिटल मध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात यामुळे सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल व आर्थिक नुकसान महागाईमुळे सर्वसामान्य जनतेस परवडत नाही या सर्व गोष्टींचा आपण निरीक्षण करून वरील वस्ती लोकांना लवकरात लवकर विनामोबदला सेवा मिळणे बाबत आपण सुरू केलेल्या उपोषणाचा माझा व शिवराय युथ फाऊंडेशन यांचा पूर्ण पाठिंबा राहील.