ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी मेडिकल कॉलेज फुकट बळकावण्यासाठीच आ. गोरेंकडून कट- कारस्थान- दिपक देशमुख

प्रतिनिधि:- दिलिप पुस्तके सातारा

मायणी मेडिकल कॉलेज फुकट बळकाविण्यासाठीच आ. गोरेंकडून कट-कारस्थाने- दिपक देशमुख .

काही अडचणीमुळे मायणी येथील मेडिकल कॉलेज आ. जयकुमार गोरे यांचे कडे भागीदारीत पार्टनरशिप देण्यात आली. मात्र संस्थेचे कर्ज भागवण्या साठी अॅग्रीमेंट झाल्यानंतर सर्व कर्ज भागवणेचे नियोजन झाले होते. तथापि सन २०१९ पासून आज अखेर आ. गोरे यांनी संस्थेचा एक रुपायाही कर्जाचा भागविला नसल्याने व सदर वैद्यकीय महाविद्यालय फुकट बळकावण्यासाठी आ. गोरेंकडून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख यांच्या विरोधात कटकारस्थाने केली जात असल्याचा आरोप दिपक देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे .
या संदर्भात प्रसिद्धीपत्रकात दिलेली माहिती अशी- आ.जयकुमार गोरे यांच्याकडे संस्थेचे असलेली कर्जे भागवण्यासाठी पार्टनरशिप देण्यात आली मात्र आज अखेर आमदार गोरे यांनी एक रुपयाही कर्ज भागविले नाही. संस्थेचे विद्यमान खजिनदार व आ. जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांनी मात्र संस्थे विरोधात ईंडी कडे तक्रार केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र संस्थेने कोणताही भ्रष्टाचार न केल्याने पळपुटी भूमिका न येता डॉ. एम. आर. देशमुख हे कर नाही तर डर कशाला म्हणून इडीच्या चौकशीस सामोरे गेले.
तसेच तेथील चालू असलेले आयुर्वेद महाविद्यलय बंद पडावे व तेथील विद्यांर्त्थी अन्य महाविद्ल्यात सामील करून घ्यावे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचा कडे आमदार महाशयांनी बनावट तक्रार केली तसेच चालू असलेले महाविद्यालय सन 2021-22 साठी आलेली मान्यता सतेचा गैरवापर करून सदर महाविद्यालयाची सन 2021-22 ची मान्यता बनावट तक्रार देऊन आलेले मान्यता नामंजूर करून घेतली वास्तविक या संस्थेच्या माध्यमातून आमदारांनी कोरोना काळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. मात्र आ. गोरे यांच्यावर कारवाई न करता आता ज्यांनी ही संस्था निर्माण केली त्यांच्यावरच कारवाई करून काय साधले याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
सन २०१२-१३, १३-१४ व १४-१५ या तीन वर्षात प्रवेश घेऊन एम.बीबी.एसचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र महाराष्ट्र शासनाने अनियमित प्रवेश केल्याने २० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. शासनाने सदर दंड कोर्टात भरला. त्यामुळे सदर महाविद्यालयावर महसूल विभागाने कारवाई करून येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्य महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. विद्यार्थ्यांकडून जमा केलेली प्रवेश ही संस्थेच्या विकासात्मक कामासाठी वापरल्याने संस्था आर्थिक अडचणीत आली व सदर देणे देणे अशक्य झाल्याने संस्थेने सदर महाविद्यालय आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे चालविण्यास दिले होते.
डॉ एम आर देशमुख यांनी या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून शेकडो हाताना रोजगार तर दिलाच पण हजारो रुग्णावर मोफत उपचार केले .मायणी मेडिकल कॉलेजच्या स्थापनेचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मोफत व वेळेवर उपचार मिळावा तसेच कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना या कॉलेज च्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण घेऊन लोकांच्या सेवा करता यावी याच उद्देशाने डॉ. एम आर देशमुख यांनी या कॉलेजची स्थापना केली परंतु शासनाच्या काही धोरणामुळे हे कॉलेज अडचणीत आल्यामुळे कॉलेजच्या आर्थिक अडचणी वाढल्या खरेतर डॉ. एम आर देशमुख यांच्यासारख्या सामाजिक भान ठेवणाऱ्या लोकांना जर असा त्रास व्हायला लागला तर समाजात चांगुलपणा दाखवायला लोक पुढे येणार नाहीत देशमुख यांना पैसा कमवायचा असता तर त्यांनी हजारो लोकांच्या वर मोफत उपचार केले नसते नुसती उपचारच नव्हे तर या रुग्णांना जेवणापासून ने आणण्याची मोफत सोय केली होती या मागचा उद्देश गरीब व जनतेची सेवा करणे एवढाच होता
यासंदर्भात सर्व चौकशींना सामोरे जाण्याचे संस्थेने ठरविले आहे. जो भ्रष्टाचार केलाच नाही तो भ्रष्टाचार लोकांपुढे मांडून लोकांची दिशाभूल करून सदर वैद्यकीय महाविद्यालय बळकावण्याचा प्रयत्न आमदार जयकुमार गोरेंकडून चालू असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button