साताऱ्यात मंगळागौरी सणानिमित्त विविध माता-भगिनींचा जल्लोष.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात मंगळागौरी सणानिमित्त विविध माता-भगिनींचा जल्लोष.
सातारा दि: सध्या काही राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था व महिला मंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंगळागौरी सणानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमामुळे माता-भगिनींच्या जल्लोष पाहण्यास मिळत आहे. मनोरंजनाची साधने असताना सुद्धा पारंपारिक कार्यक्रमांमुळे खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात लाडकी माता-भगिनी यांचा सन्मान केला जात आहे.
श्रावण महिन्यात मंगळागौरी हा हिंदू धर्मातील व्रत वैकल्य आहे. मंगळागौरीची पूजा नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतरच्या पाच वर्ष प्रत्येक मंगळवारी करायची असते. सर्व काही मंगल होवो. घरात सुख संपन्नता नांदो,गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना व विधीपूर्वक पूजा केली जाते. विविध देवी देवतांची मनोभावे पूजा केल्यानंतर दीप प्रज्वलन करून अनेक ठिकाणी अशा मंगळागौरी कार्यक्रमाच्या शुभारंभ केला जातो. यासाठी मान्यवर व प्रसिद्ध सेलिब्रिटी यांनाही निमंत्रण दिले जात आहे. त्याचबरोबर पारंपरिक फुगडी व इतर पारंपारिक पद्धतीने मंगळागौरीच्या गीताने सामुदायिक रित्या माता भगिनी सहभाग घेत आहेत. विशेष बाब म्हणजे वयोवृद्ध महिला सुद्धा कणकर शरदृष्टी व ताठ मानेने फुगडी, गवळण फुगडी,वटवाघूळ फुगडी,बस फुगडी,तवा फुगडी,फिगरी फुगडी,वाकडी फुगडी,कासव फुगडी, भुई फुगडी,दंड फुगडी,एकहाती फुगडी,फुलपाखरू फुगडी,पद्मासन फुगडी,चौफुला फुगडी,हात फुगडी,जाते फुगडी, उठबस फुगडी,कुलूप किल्ली फुगडी,केरसुणी फुगडी,त्रिफुला फुगडी,नखुल्या फुगडी,जातं फुगडी त्याचबरोबर जुन्या पिंगा व झोक्यावरील खेळ ग्रामीण भागात खेळले जात आहेत. अशा प्रकारच्या विविध खेळांमुळे नवोदित माता भगिनींना सुद्धा वयोवृद्ध महिला प्रेरित करत आहेत. हे सर्व खेळ शारीरिक व्यायामासाठी चांगले असल्याने वैद्यकीय अधिकारी सुद्धा अशा खेळांना सहभागी होण्याचे सल्ले देत आहेत. सर्व जाती धर्मातील माता-भगिनी यामध्ये सहभागी घेत आहेत.
मंगळागौरी कार्यक्रमामुळे मनोरंजन व खेळ त्याचबरोबर अनेक भेट वस्तू देण्याचे काम आयोजक करत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावणी महोत्सव, महा भोंडला, दीपोत्सव ,फोटोशूट, फॅशन शो, रेसिपी स्पर्धा, उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मिळत आहे. महिलांना मंगळागौर एक पर्वणीच ठरली आहे. विशेष बाब म्हणजे अशा या पारंपरिक सण साजरा करण्यासाठी बाल चिमुकल्यांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे.
पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी संबंध जोडून महिलांच्या कलागुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी या सणांची योजना आखण्यात आलेले आहे. मनोरंजनाचे विविध साधने असून सुद्धा या पारंपारिक खेळाला टवटवीत व ताजेपणा आलेला आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमाची क्रेझ वाढू लागली आहे त्यामुळे आता सर्व महिला मंडळ विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्ष आता स्वतःहून सहभागी होताना दिसत आहेत.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन