आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-आदरणीय जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

आदरणीय जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा….

खरं म्हणजे जेष्ठ पत्रकार कात्रेसाहेब आणि माझा व्यक्तिगत परिचय सुमारे तीस वर्षापासून आहे. त्यामुळे त्यांची 61 निमित्त अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे.
कराड तालुक्यातील हेळगाव (पाडळी) चे कात्रे कुटुंबीय पोस्टातील नोकरी निमित्त दहिवडी- वडूज- कराड सातारा अशा पद्धतीने सातारा शहरात विसावले आहेत. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यानंतर श्रीकांत कात्रे यांचा सांभाळ त्यांच्या बहिणीने केला.
आज सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रांमध्ये संयमी व शांत म्हणजेच दैनिक सकाळ अशीच प्रतिमा निर्माण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आज पत्रकारितेमध्ये तंत्रज्ञान बदलले असल्यामुळे खिळे- ठोकळा हे आता कालबाह्य झालेले आहे. आणि त्याच्या जागी आता एका बटन दाबले की कॅल्क्युलेटर प्रमाणे संख्या समजते. असे तंत्रज्ञान आलेले आहे. एकदा एका वाचकाने आपुलकीने घरी जेवायला बोलावले. ते वाचक म्हणजे शाहूपुरीतील पोस्टातून सेवानिवृत्त झालेले सपकाळ हे होते. खरं म्हणजे त्यांनी जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांना जेवायला बोलावले होते आणि योगायोगाने मला सुद्धा निमंत्रण मिळाल्यामुळे मी सुद्धा गेलो. अत्यंत साधे जेवण, साधे घर परंतु कोणताही व्यक्तिगत पसंती न दाखवता अगदी घरगुती पद्धतीने गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेतला. पत्रकार श्रीकांत कात्रे व सपकाळ गुरुजी यांचे आपुलकीचे नाते पाहण्यास मिळाले. पत्रकार आणि वाचक यांचे ऋणानुबंध असतात. याची खूणगाठ कायम मनात राहिलेले आहे. अलीकडच्या काळामध्ये एखाद्या वाचकांनी घरी जेवायला बोलावलं तर साध्या शिकवू सुद्धा तो कमीपणा समजतो आणि सहजरित्या घरी काय हॉटेलमध्ये बोलवा… असं बेधडक बोलून जातो. पण पंचवीस तीस वर्षांपूर्वी एखाद्याच्या घरी जाऊन साधे जेवण करणे. हा मनाचा मोठेपणा ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रींच्या मुळेच पाण्यास मिळाला.
त्यांच्या पत्रकारितेची खऱ्या अर्थाने सुरुवात जी झाली पुणे येथील प्रसिद्ध अशा दैनिक केसरी या दैनिकातून त्यानंतर नाशिक येथे आज इलेक्ट्रॉनिक मीडिया बादशहा समजणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, उत्तम कांबळे यांच्यासोबत पत्रकारितेमध्ये चांगले काम करण्याची संधी मिळालेले श्रीकांत कात्रे हे साताऱ्यातील पत्रकार आहेत.
आज आदरणीय जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे हे पुण्याच्या दैनिक प्रभात मध्ये कार्यरत आहेत. आज त्यांच्या दोन्ही मुली विद्याविभूषित होऊन एक आसाम व दुसरी मुलगी बंगलोरला मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत .त्यामुळे सध्या चांगल्या पद्धतीने व समाधानी जीवन ते जगत आहेत. त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून एक किस्सा असा आहे की, संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्चेत असलेल्या दाभोळा प्रकल्पाबाबत खुलेआम चर्चा होत होती. त्यावेळेला या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी साताऱ्यातील पत्रकार आदरणीय बापूसाहेब जाधव, विजय मांडके, सुभाष देशमुख, बापू आपळे, रवींद्र बेडकीहाळ व दिनकर झि ब्रे गेले होते. त्यावेळेला चिपळूणच्या शासकीय विश्राम गृहात ते थांबले असता मध्यरात्री दोन वाजता तात्कालीन महसूल मंत्री व शिवसेना नेते नारायण राणे अचानक आपल्या दौऱ्यानिमित्त चिपळूणच्या विश्रामगृहात आले. त्यावेळी साताऱ्यातील पत्रकारांनी मोठ्या धाडसाने मध्यरात्री दोन वाजता सुद्धा दाबोळा प्रकल्पाबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. आणि पत्रकार जागृत असतो हे दाखवून दिले.
आज साताऱ्यातील पत्रकारितेमध्ये जुन्या पिढीतील अनेक पत्रकार हे कार्यरत आहेत. त्यांची कामाची पद्धत सामान्य माणसाची असलेली नाळ व पत्रकारितेबद्दल असणारे प्रेम यांच्या त्रिवेणी संगम पाहण्यास मिळतो. हा ठेवा खरं म्हणजे सर्वांनाच लाभत नाही. पण, ज्यांना लाभले अशांपैकी जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यामध्ये श्रीकांत कात्रे यांचा जाणीवपूर्वक उल्लेख करावा वाटतो.
आज आपला राजकीय मजकूर लेख व प्रसिद्धी पत्रके छापून यावे म्हणून कौतुकांचा वर्षाव केला जातो. परंतु, ही बातमी पेस्ट करणारे किंवा ती बातमी पानात लावणाऱ्यांना त्यांचाही वाढदिवस असतो. याचा अनेकांना विसर पडतो. याची यानिमित्त आठवण करून द्यावी वाटत आहे. आदरणीय जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांना निरोगी व आरोग्यदायक आयुष्य लाभो अशी भगवान गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांना आभाळभर नव्हे पण चिमुटभर का होईना पण प्रामाणिकपणे हार्दिक शुभेच्छा देतो —-आपलाच स्नेही=== पत्रकार अजित जगताप, सातारा

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button