आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-छत्रपतींच्या उंच पुतळ्यासाठी राजधानीतील शेतकरी पुत्र प्रयत्नशील…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

छत्रपतींच्या उंच पुतळ्यासाठी राजधानीतील शेतकरी पुत्र प्रयत्नशील…

सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणजे सातारा असे जगभर नावलौकिक प्राप्त केले आहे. या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा व सातारचे नाव राजधानी करण्यासाठी शेतकरी पुत्र संजय बाबासाहेब भगत प्रयत्नशील असल्याची माहिती सातारा येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत दिली.
जगातील सर्वात उंच रयतेच्या छत्रपतींचा पुतळा सातारा जिल्ह्यात उभारणीसाठी सध्या सर्वच शिवप्रेमी मागणी करत आहेत. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फूर्ती स्थान म्हणून विकसित करण्याची परवानगी मिळावी व राजधानी म्हणून सातारची नवी ओळख व्हावी. यासाठी शेतकरी पुत्र श्री भगत प्रयत्न करत आहेत. सातारा जिल्ह्यात विशेष ग्रामसभा बोलवून दहा दिवसाच्या आत मध्ये ग्रामसभेत ठराव करून या कार्याला गती द्यावी. अशी त्यांनी विनंती केलेली आहे .याबाबतच्या सर्व कागदपत्राची पूर्तता करण्याची ही जबाबदारी शेतकरी पुत्र श्री संजय भगत यांनी घेतलेली आहे.
रयतेचे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फूर्ती स्थान निर्माण करण्यासाठी सरकारचा एक रुपया न घेता रयतेच्या पैशातूनच हे भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे. १९९६ सालापासून पत्रकारिता करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त ही संकल्पना श्री भगत यांच्या मनात रुजली होती. या विषयावर सलग २८ वर्ष मंथन केले आहे. आता हा विषय मांडण्याची गरज व योग्य वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक घटनांबाबत अभ्यासक व जगभरातील शिवप्रेमी प्रयत्नशील आहेत. असे त्यांनी नमूद केलेले आहे. सदरच्या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवरांना पाठवले असून लवकरच जगातील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारण्याचे स्वप्न केव्हा साकार होणार? याकडे आता शिवप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button