खटाव तालुक्यातील कोतवाल पदाची आरक्षण सोडत जाहीर.
पत्रकार प्रमोद देवाडिगा:- ( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ):9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडिगा:- ( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष )
खटाव तालुक्यातील कोतवाल पदाची आरक्षण सोडत जाहीर.
पुसेसावळी (प्रतिनिधी ): खटाव तालुक्यातील ११ कोतवालांच्या भरती संबंधीची आरक्षण सोडत निवड समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी माण खटाव, समितीचे सदस्य,सचिव व नागरिक यांच्या उपस्थितीत वडूज येथील तहसील कार्यालयात १७ जुलैला सोमवारी दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली,
यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील कोतवालांच्या रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्याचा सुधारीत कार्यक्रमा अंतर्गत आरक्षण सोडतीमध्ये निश्चित झालेले प्रवर्गनिहाय सजे पुढील प्रमाणे,गोपूज- अनुसूचित जमाती महिला, खातगुण- अनुसूचित जमाती सर्वसाधारण, सिद्धेश्वर कुरोली- भ.ज.क. महिला,
येळीव-भ.ज.क सर्वसाधारण,म्हासुर्णे- भ.ज.इ. सर्वसाधारण, डिस्कळ- वि.मा.व. प्रवर्ग सर्वसाधारण,भोसरे- इ.मा.व. सर्वसाधारण महिला,नांदोशी- इ.मा.प्रवर्ग सर्वसाधारण,चोराडे- इ.मा.प्रवर्ग सर्वसाधारण, या प्रमाणे ११ सजासाठी अंतिम कोतवाल आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरित २ सजे हे औंध,बोंबाळे सजे आरक्षण सोडतीच्या कोणत्याही टप्यात चिठठी मधून आलेले नाहीत. त्यामुळे सदर सजे आरक्षणासाठी विचारात घेण्यात आले नाहीत त्यामुळे हे सजे रिक्त राहिले असल्याचे कोतवाल निवड समिती अध्यक्ष,सदस्य सचिव यांनी माहिती
दिली.