क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर:-धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रम चालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, कन्नडमधील घटना.

पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक

RPS STAR NEWS

धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रम चालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, कन्नडमधील घटना.

 

आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय. दादासाहेब अकोलकर (वय 67) या आरोपीविरुद्ध कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात गेल्या दहा वर्षांपासून आध्यात्मिक शिक्षण, वादन, गायनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आश्रम चालवण्यात येतो. या आश्रमातील मुली जवळच असलेल्या एका शाळेत शिक्षण घेतात आणि शाळा सुटल्यानंतर आश्रमात परत येतात.

20 ऑगस्ट रोजी रात्री आश्रमचालक दादासाहेब पुंडलिक अकोलकर याने दोन अल्पवयीन मुलींना आपल्या खोलीत बोलावून लज्जा वाटेल असेल कृत्य करत लैंगिक अत्याचार केले. शिवाय, या घटनेची वाच्यता केल्यास आश्रमातून हाकलून देण्याची धमकी दिली. पीडित मुलींकडे मोबाईल नसल्याने आणि आश्रमचालकाची दहशत असल्याने दोन दिवस त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. पीडिताच्या पालकांनी आज आश्रमात येऊन आश्रमचालक दादा महाराज अकोलकर यास जाब विचारला मात्र त्याने उडवाउडवीची उतरे दिली. याप्रकरणी पीडित मुलींच्या फिर्यादीवरून दादासाहेब पुंडलिक अकोलकर ऊर्फ दादा महाराज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button