गंगापूर:-रायपूर येथील शेतकऱ्याचा मुलगा फौजदार – एकाच घरातील सख्खे भाऊ एक पोलीस तर दुसरा फौजदार.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
रायपूर येथील शेतकऱ्याचा मुलगा फौजदार – एकाच घरातील सख्खे भाऊ एक पोलीस तर दुसरा फौजदार.
रायपूर तालुका गंगापूर छत्रपती संभाजी नगर येथील पोपट बबन जाधव हा नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड यादी मध्ये फौजदार पदावर रुजू झाला आहे. सदरील बातमी गावात समजतात गावकऱ्यांनी प्रचंड जल्लोष केला. डीजे, फटाक्यांची आतीषबाजी, गावातून मिरवणूक तथा स्वागत आणि सत्कार यावेळी फौजदार पोपट बबन जाधव यांचा गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. मिरवणुकी दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर बौद्ध विहारामध्ये पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. पंचशील,त्रिसरण अण्णाभाऊ महसुजी कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर असलेल्या प्रांगणांमध्ये स्वागत सभा घेण्यात आली. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ मीनाताई कीर्तीकर या होत्या कार्यक्रमासाठी उपसरपंच योगेश घिटरे,माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर आहेर, डोणगाव चे सरपंच संजीव सुलाने,डोणगाव चे पोलीस पाटील भालचंद्र पाटील डोणगावकर, परिसरातील प्रसिद्ध निवेदक माळीवाडगाव येथील ज्ञानेश्वर वाकचौरे, डोणगाव येथील नवनियुक्त फौजदार कुणाल करतारसिंग सुलाने, विश्वनाथ हरकळ, देरळ येथील अशोक कर्डिले, किनळ येथील विठ्ठल शेलार, पाडळशाचे माजी ग्रामपंचायत सदस्य केशव कुकलारे, माजी सरपंच काशिनाथ निकम, तंटामुक्तीचे अध्यक्ष अंबादास निकम, माजी सरपंच गणेश देशमुख, माजी सरपंच कचरू घोडके यासह विद्यार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ज्ञानेश्वर वाकचौरे,जीवन देशमुख,ज्ञानेश्वर आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नवनिर्वाचित फौजदार पोपट जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आतापासूनच आपण सर्वांनी मन लावून अभ्यास करावा. शालेय स्तरावर ज्या विविध शालेय स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये सहभाग नोंदवून आतापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करावी. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठले तरी कलागुण सामावलेले असतात त्या गुणांना ओळखून आपण मार्गक्रमण करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील बाबासाहेब जाधव यांनी केले. प्रस्तावना सागर हरिश्चंद्र कीर्तीकर यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रमोद देशमुख यांनी केले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन गावातील तरुण मित्र मंडळ गणेश देशमुख (हॉटेल निवांत) प्रमोद देशमुख राजू पठाण सागर कीर्तीकर अशोक (किर्तीकर समाजसेवक) सुनील जाधव, राजू जाधव, धनंजय जाधव,अमोल जाधव(पोलीस), यांनी केले होते.