वाई:-प्रभाग क्रमांक तीन फुलेनगर येथील अर्धवट स्वरूपातील गटर व रस्ता काम तात्काळ पूर्ण करा. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रणित मोरे यांची नवनिर्वाचित वाई नगराध्यक्षांकडे मागणी.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-प्रभाग क्रमांक तीन फुलेनगर येथील अर्धवट स्वरूपातील गटर व रस्ता काम तात्काळ पूर्ण करा. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रणित मोरे यांची नवनिर्वाचित वाई नगराध्यक्षांकडे मागणी.

दिनांक 8 जानेवारी रोजी वाई नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीन फुलेनगर बौद्ध वस्ती येथील कारळे घर ते नगरपरिषद सार्वजनिक शौचालय पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे व बंदिस्त गटार करणे अशा स्वरूपाचे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत असणारे काम नगरपरिषद कार्यालय मार्फत संकेत शशिकांत संकुळी या ठेकेदारास देण्यात आले आहे. सदर कामाचा कार्यादेश हा 7/4/2025 रोजी देण्यात आला आहे. कामाची मुदत ही 90 दिवस (पावसाळा वगळता) याप्रमाणे देण्यात आली आहे परंतु, ती वाढवून आल्याचे निदर्शनात आहे. पावसाळा संपून दोन महिने झाले तरी कोणत्याही प्रकारचे काम ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले नाही. तसेच केलेल्या कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि निकृष्टपणा आढळून येत आहे. सदर कामात दिरंगाई करणाऱ्या आणि निकृष्टपणे काम करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करून त्या ठिकाणी नवीन ठेकेदाराची नेमणूक करून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत ठेकेदाराने केलेल्या कामाचे गुणवत्ता तपासणी करून स्थळ पाहणी करण्यात यावी , व ज्या – ज्या ठिकाणी काम निकृष्ट झाले आहे त्या ठिकाणी ते उत्तम स्थितीत करून देण्यात यावे .तसेच सदर निवेदनावर येणाऱ्या कालावधीत प्रशासनामार्फत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यास दलित वस्तीसाठी आलेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत झालेल्या यांनी कृष्ट कामांच्या निषेधार्थ कार्यालयाबाहेर आंदोलन करू व वरिष्ठांकडे याबाबत दाद मागु असा इशाराही निवेदनाद्वारे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे यांनी दिला आहे. सदर निवेदन देताना वाई तालुकाध्यक्ष विजय भाऊ सातपुते, जिल्हा संघटक विकास दादा जाधव, शहर अध्यक्ष रणवीर परदेशी, युवक अध्यक्ष आकाश गायकवाड, रोहित बंडा कवळे, विशाल जाधव आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.




