पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
प्रतिनिधी:- रफिक शेख पुणे:-9021132121

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमुळे
नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
पुणे, निगडी, दि. 4 (शफिक शेख):- येथील सेक्टर नं. 22 आझाद चौक मधील गणेश हौसिंग सोसायटीमागे प्रचंड प्रमाणात ड्रेनेजचे घाण पाणी, कचरा, दुर्गंध यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य आणि एकुणच त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर प्रकरण हे प्रलंबित असून आरोग्य विभाग, ड्रेनेज विभाग आणि इतर जबाबदार विभाग यांचे याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे.
या ठिकाणी जवळच यमुनानगर हाॅसिपटल असून सोसायटीला लागूनच भाजीमंडई आहे त्यामुळे त्या हाॅस्पिटलमधील रूग्ण आणि येथील ये जा करणा-या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर विषयी ड्रेनेज विभागाचे सुपरवायझर नितीन वाघमारे यांना विचारले असता त्यांचे म्हणणे आहे की नागरिक चेंबर फोडतात, कचरा टाकतात अतिक्रमण करतात त्यामुळे त्यांना काम करता येत नाही.
याविषयी अधिक माहितीसाठी आरोग्य खात्याच्या ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल भोईर यांना मोबाईवरून विचारले असता वरिष्ठांकडून त्यांना साथ मिळत नसल्याचे आणि नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकुणच पूर्ण परिस्थितीसमोर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आणि ड्रनेज विभागाने गुडघे टेकले असून सामान्य नागरिकांची ” आम्ही पहावे कोणाकडे”, अशी अवस्था झााली आहे.
या समस्येची तक्रार सारथी हेल्पलाईनवर (टोकन क्रमांक एमए2954, एमए30589, एमए31084) याद्वारे शफिक शेख यांनी अनेकवेळा तक्रार करूनही त्यावर कारवाई करण्यात असमर्थता दर्शविण्यात आली आहे.
सदर समस्येचे निराकरण व्हावे म्हणून आम आदमी पार्टीच्या महिला उपाध्यक्षा सौ. मैमुना शेख, सामाजिक कार्यकर्ता अब्दुल्ला मुकरताल, इरफान नैसर्गी, बंदेअली सयद, इम्तियाज खान, अल्ताफ शेख यांनी पाठपुरावा केला.