छत्रपती संभाजीनगर:-मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर.
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर.
छत्रपती संभाजी नगर दी.2
मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय आहे, त्यादृष्टीने विविध योजना राबवित असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले.
मी इतके दिवस म्हणायचो की मला एक बहीण आहे; पण मुख्यमंत्री झाल्यापासून तुमच्या रूपाने राज्यातल्या लाखो बहिणी मला मिळाल्या, हे माझं भाग्य आहे. मी जिथे जातोय तिथे बहिणी राखी बांधायला येतात. इतकं नशीबवान भाऊपण मिळायला भाग्य लागतं. तुमच्या या भावाची जबाबदारीपण आता वाढली आहे. या योजनेमुळे देशपातळीवरही राज्याचे कौतुक झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एक स्त्री म्हणजे एक आख्खं कुटुंब. राज्यातील प्रत्येक कुटुंब सुखी – समाधानी करणं हे सरकारचं पहिलं आणि अंतिम ध्येय आहे. महिला सक्षमीकरण हे सरकारच्या प्रत्येक निर्णयात ते दिसलं पाहिजे. शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये एका बहिणीला मिळतील. बहिणींना आता फक्त रक्षाबंधन किंवा भाऊबिजेलाच ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर देणारी ही योजना कायमस्वरूपी आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लाडकी लेक योजना, मुलींचे उच्च शिक्षण मोफत, एस.टी. प्रवासात 50 टक्के सवलत, महिला सशक्तीकरण अभियन अशा विविध योजनांमधून एका वर्षांत दोन कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा लाभ झाला असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
फक्त बहिणींसाठी नव्हे तर लाडक्या भावांसाठीसुध्दा मुख्यमंत्री युवा अप्रेंटिंसशीप योजना आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्य कल्याणकारी योजनांसाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांची तजवीज केली आहे. जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी अटी कमी केल्यात. राज्यातील महिलांच्या चेहऱ्यावर या योजनेमुळे आनंद निर्माण झालाय हे सत्य आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन लाख अर्ज मंजूर झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी बहिणींचे अभिनंदनही केले.
मराठवाडा वॉटर ग्रीडची आजवर फक्त चर्चाच व्हायची. पण या योजनेची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे. जिल्ह्यात उद्योगासाठी गुंतवणुक होत असून रोजगारनिर्मिती होणार आहे असे सांगून हिरकणी कक्ष बांधण्यासाठी ७५ लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.