वाई:-रेशनिंग कार्ड धारकांना सर्वर डाऊनमुळे होणारा नाहक त्रास दुर करावा-तालुकाप्रमुख दत्ताबापु इथापे,सुरेश चव्हाण.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
वाई:-रेशनिंग कार्ड धारकांना सर्वर डाऊनमुळे होणारा नाहक त्रास दुर करावा-तालुकाप्रमुख दत्ताबापु इथापे,सुरेश चव्हाण.
सर्व्हर डाऊन असल्यामुळे कार्डधारक व सर्व रेशनिंग दुकानदार यांना नाहक त्रास होऊ नये म्हणुन शासनाने लक्ष घालून ऑनलाईन सेवा सुरळीत करावी यासाठी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदार वाई मा.मेटकरी मँडम यांना निवेदन देणेत आले.सर्वर डाऊन मुळे रेशनिंग दुकानदार व ग्राहक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे बरेच पात्र रेशनिंग धारक अन्नधान्यापासुन वंचित राहत आहेत.तरी आँनलाईन पध्दतीने येणाऱ्या अडचणी दुर करणेकामी सर्वर कार्यान्वीत राहणेसाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसिलदार वाई यांना आज देण्यात आले.सदरील प्रसंगी शिवसेना वाई तालुकाप्रमुख श्री. दत्ताबापु इथापे(पुर्व भाग), तालुकाप्रमुख श्री. सुरेशराव चव्हाण(पश्चिम भाग), तालुका समन्वयक श्री.संतोष पोफळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख व प्रतापगड उत्सव समितीचे श्री. स्वप्नील भिलारे,वाई शहरप्रमुख श्री. गणेश जाधव,उप तालुकाप्रमुख श्री. विवेक भोसले, उपतालुकाप्रमुख श्री.भरतराव गोळे, विभागप्रमुख श्री.हणमंत पवार,विभागप्रमुख श्री. विशाल बाबर, विभागप्रमुख श्री. शंकर शिळीमकर, विभागप्रमुख श्री. नितीन गोवंडे, उपशहरप्रमुख श्री.सोमनाथ आवसरे, युवासेना विभागप्रमुख श्री. प्रतिक पवार , उपविभागप्रमुख श्री.तेजस पवार,उपविभागप्रमुख गणेश गणेश कीर्दत व शिवसैनिक उपस्थित होते.