गंगापूर:-रायपुरात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
गंगापूर:-रायपुरात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
रायपूर तालुका गंगापूर या गावी आज दिनांक एक ऑगस्ट 2024 वार गुरुवार रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी करण्यात आली. सरपंच श्रीमती मीनाताई कीर्तिकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच योगेश घिटरे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता घीटरे, पोलीस पाटील बाबासाहेब जाधव, संतोष कीर्तीकर, जयवंता देशमुख, उपसरपंच कचरू घोडके, सागर कीर्तीकर, कैलास लोंढे, सुभाष कीर्तीकर, शिवाजी वैराळ, राजू भाऊ कीर्तीकर, किरण घोडके, हॉटेल निवांत चे गणेश देशमुख,
यावेळी काही विद्यार्थ्यांनी भाषण केली, तसेच मान्यवरांच्या वतीने सुनिता घिटरे, पोलीस पाटील बाबासाहेब जाधव, सागर कीर्तीकर यांनी मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक अशोक कीर्तीकर यांनी केले तर आभार संतोष किर्तीकर यांनी मांडले. कार्यक्रमासाठी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.