आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-महसूल पंधरवड्याचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ. पंधरवड्यात नागरिकांना विविध योजनांचा लाभ द्यावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

RPS STAR NEWS

महसूल पंधरवड्याचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ.
पंधरवड्यात नागरिकांना विविध योजनांचा लाभ द्यावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

 

सातारा, दि. 1 : महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्ट कालाधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पंधरवड्यात विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती करुन नागरिकांना प्रत्यक्ष लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल पंधरवड्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. शासनाच्या महत्वकांक्षी योजना गतीने राबवयाच्या असतील तर त्याची जबाबदारी महसूल विभागाकडे दिली जाते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांच्या अंमलबाजवणीसाठी महसूल विभाग समन्वय म्हणून काम करीत आहे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामांमुळे शासनाबरोबरच नागरिकांचाही महसूल विभागावर विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाला पुढेही सार्थ ठरवूया.
महसूल विभागाचे काम गतीने व्हावे यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करुन कामात पारदर्शकता वाढवावी. नागरिकांची कामे गतीने करावी, असे सांगून महसूल दिनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
महसूल पंधरवड्यात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्यावा. सातारा जिल्हा शासनाच्या विविध योजना राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. हा पंधरवडा राबविण्यातही अग्रेसर राहील, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने व कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी महसूल पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास प्रांताधिकारी, तहसीलदार व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button