फलटण:-जुनी पेन्शन छत्री मोर्चा व धरणे आंदोलनास जास्तीत जास्त सहभागी व्हावे – गणेश तांबे.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
जुनी पेन्शन छत्री मोर्चा व धरणे आंदोलनास जास्तीत जास्त सहभागी व्हावे – गणेश तांबे.
गुरुवार दिनांक १ऑगस्ट २०२४ रोजी जुनी पेन्शन छत्री मोर्चा व धरणे आंदोलनास सातारा जिल्हा शिक्षक समिती( मान्यताप्राप्त) शाखा- फलटण यांचा जाहीर पाठिंबा असून सातारा जिल्हा शिक्षक समिती (मान्यता प्राप्त) शाखा-फलटण नेहमीच जुनी पेन्शन संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेत असते. त्या संदर्भातील पाठिंब्याचे पत्र जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रितेश गायकवाड,तालुकाध्यक्ष निलेश जाधव ,सरचिटणीस गजानन सोनवलकर यांना देण्यात आले.या वेळेस सातारा जिल्हा शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष धन्यकुमार तारळकर,फलटण तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष गणेश तांबे, सरचिटणीस संतोष मोहिते उपस्थित होते.सातारा जिल्हा जुनी पेन्शन संघटनेने गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या कार्यालयासमोर छत्री मोर्चा व धरणे आंदोलन आयोजित केले असून आमच्या सर्व सहकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही ताबडतोब लागू करावी यासाठी आम्ही सर्व आपल्या सोबत आहोतच. जोपर्यंत आपल्या हक्काची जुनी पेन्शन मिळत नाही. तो पर्यंत सदैव सोबत असणारच,आणि सर्वतोपरी पाठिंबा जाहीर करत आहे. तसेच सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन फलटण तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष (मान्यताप्राप्त) गणेश तांबे यांनी केले आहे.