मुंबई:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट.
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट.
मुंबई दि. 31
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांची आज जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्र हे उद्योगस्नेही आणि गुंतवणूकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. जपानी कंपन्यांसाठी पुणे जिल्ह्यातील सुपे येथे विशेष इंडस्ट्रीयल पार्क विकसित करण्यात येणार असून भविष्यात देखील राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी श्री. कोजी यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच आजच महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी टोयोटा किर्लोस्कर सोबत करार करण्यात आला आणि श्री. कोजी यांनी महाराष्ट्राला भेट दिली हा चांगला योगायोग आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भारत आणि जपान हे आशिया खंडातील महत्वाचे देश असून दोन्ही देशात खूप जुने आणि मजबूत संबंध आहेत. महाराष्ट्र हे भारतातील गुंतवणूकीसाठी उद्योगांच्या पहिल्या पसंतीचे राज्य आहे. जपानी कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असून राज्याच्या आणि मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासात देखील मोठे सहकार्य दिले आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन ही याची उदाहरणे आहेत. आमच्या सरकारच्या माध्यमातून एमटीएचएल अपेक्षीत वेळच्या आत पूर्ण करण्यात येऊन जनतेसाठी खुला करण्यात आला. तर बुलेट ट्रेनच्या कामाला सुद्धा मोठा वेग देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एमटीएचएल आणि बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून जपान महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात जपान सहभागी आहे, याचा आनंद आहे असे सांगून कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जपानचा सहभाग असलेले प्रकल्प वेगाने मार्गी लागले आहेत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतूक केले.