कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा निकम वस्ती येथे शालेय किट चे वाटप.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
RPS STAR NEWS
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा निकम वस्ती येथे शालेय किट चे वाटप.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकम वस्ती सुरेगाव येथे सुरेगावचे सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे सेवासयोग संस्थेचे माननीय सारंगी वाबळे यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे पूर्ण शालेय किटसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकम वस्ती येथे 18 शालेय किटचे वाटप करण्यात आले यावेळी माननीय दिनकरराव बच्चन निकम माननीय सत्यवान दाजीबा निकम माननीय अशोक जिरे अशोक सोनवणे भाऊसाहेब पवार विमलबाई निकम सुनिता सोनवणे ,मानसी निकम आदी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्यउपस्थित होते .
शालेय व्यवस्थापन समिती यांनी विद्यार्थ्यांना लाडू बिस्किटे व खाऊचे वाटप विद्यार्थ्याला करून गुणवंत विद्यार्थ्यांचे भाषणे होऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला मा मुख्याध्यापक रमेश निकम सर महाराष्ट्र राज्य प्रवक्ते यांनी सूत्रसंचालन केले तर आभार राहुल भागवत सर यांनी मानले.