वडूज:-त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वडूज:-त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

वडूज- दि.१६ ऑक्टोबर २०२५
सासपडे येथील झालेल्या कुकृत्याच्या निषेधार्थ आरोपीस लवकरात लवकर मृत्यूदंड देण्यात यावा व अशा प्रकारचे कृत्य समाजात परत होऊ नये यासाठी जरब शासन बसावे यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खटाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार व पोलिस प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेले कुकृत्य समाजाला काळिमा फासणारे असून अशा वृत्तीचा छत्रपती श्री शिवरायांनी ज्या पद्धतीने “चौरंगा” केला त्याच पद्धतीने आरोपीचा खात्मा करावा. समाजात अशा पद्धतीची घटना पुन्हा घडूच नये यासाठी कठोरात कठोर शासन करून स्त्रीयांवर अत्याचार अथवा बलात्कार केल्यास काय होते याचे उदाहरण समाजाच्या समोर ठेवावे अशी भावना यावेळी समस्त धारकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.




