आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-संस्था म्हणजे सौंदर्यदृष्टी आणि उपयोगिता याचा मिलाफ – डॉ.पी.डी.पाटील

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

संस्था म्हणजे सौंदर्यदृष्टी आणि उपयोगिता याचा मिलाफ – डॉ. पी. डी. पाटील
पिंपरी, दि. 01 (शफिक शेख) :- संस्था म्हणजे चार भिंतींची इमारत नसते. तिथे सौदर्यदृष्टी आणि उपयोगिता याचा मिलाफ असावा लागतो. मी आत्मस्तुती करतो पण माझ्याकडे ती दृष्टी होती. म्हणून आम्ही इतक्या चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करू शकलो, असे डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले.
आपल्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव समारंभात डॉ. पी. डी. पाटील बोलत होते. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या सुरू आहे. आणखी २५ वर्षांनी स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. आगामी काळात एज्युकेशन आणि फ्यूचर (E=F) अर्थात शिक्षण आणि भवितव्य हेच नव्या भारताचे समीकरण माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. ड़ॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने ते ओळखले आहे त्याच विचारांतून त्यांनी आपल्या शिक्षणसंस्थांची उभारणी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. सदानंद मोरे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. मकरंद जावडेकर, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. यशराज पाटील, डॉ. संजय पाटील, पुढारी समूहाचे संचालक डॉ. योगेश जाधव तसेच पी. डी. पाटील यांचे कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. पी.डी. पाटील यांचे असंख्य चाहते, स्नेही आणि मित्रमंडळींनी या समारंभाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. डी. वाय. पाटील विद्यापीठातील तसेच संलग्न संस्थांमधील प्राचार्य तसेच विभागप्रमुखांच्या वतीने डॉ. पी. डी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पी. डी. पाटील भावूक झाले होते. ते म्हणाले, “पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिली त्यामुळेच मी इथवर वाटचाल करू शकलो. शिक्षणसंस्थांच्या इमारतींचे बांधकाम मी जातीने लक्ष घालून केले. संस्था म्हणजे चार भिंतींची इमारत नसते. तिथे सौदर्यदृष्टी आणि उपयोगिता याचा मिलाफ असावा लागतो. मी आत्मस्तुती करतो पण माझ्याकडे ती दृष्टी होती. म्हणून आम्ही इतक्या चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करू शकलो. आज आमचे खासगी मेडिकल कॉलेजशी संलग्न रुग्णालय देशात पंधराव्या स्थानी, पश्चिम भारतात पाचव्या आणि पुण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेंटल कॉलेज देशात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. आमचे डॉ. डी. वाय पाटील हॉस्पीटल महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे धर्मादाय रुग्णालय आहे.” डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटीच्या विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांनी आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button