पुणे:-पुण्यातील गंगाधाम चौक ठरतोय मृत्यूचा सापळा – पुण्यातील गंगाधाम येथील आई माता चौकामध्ये भीषण अपघात.
पत्रकार विजय देवकुळे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुकाध्यक्ष
पुण्यातील गंगाधाम चौक ठरतोय मृत्यूचा सापळा –
पुण्यातील गंगाधाम येथील आई माता चौकामध्ये भीषण अपघात.
या अपघातामध्ये एका ट्रकने 25 वर्षे महिलेचा बळी घेतला आहे ट्रकने अक्षरश त्या महिलेला चिरडले आहे. या घटनेमध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे याचा तपास मार्केट यार्ड पोलीस करीत आहेत. या अपघातामुळे त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आणि महत्त्वाचे म्हणजे हा अपघात झाला तेव्हा त्या चौकामध्ये एकही ट्राफिक पोलीस हजर नव्हता त्यामुळे तेथील नागरिक संतप्त झाले होते. त्या ठिकाणापासून मार्केट यार्ड जवळ असल्यामुळे मालाने भरलेले ट्रक गंगाधाम ते मार्केट यार्ड चौकापर्यंत रस्त्यावरच थांबलेले असतात त्याच्यामुळे ट्राफिक जाम होते व रोज छोटे-मोठे एक्सीडेंट होत राहतात गंगाधाम चौकातून कात्रज कडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी घालायला पाहिजे असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे त्या चढावरती नेहमी जड वाहने बंद पडलेली असतात त्यामुळे ट्राफिक जाम होते.