कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-कळंभे गावाच्या विकासाला ४६ लाख ७५ हजारांचा निधी! ११ विकासकामांचे दिमाखात भूमिपूजन; लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-कळंभे गावाच्या विकासाला ४६ लाख ७५ हजारांचा निधी! ११ विकासकामांचे दिमाखात भूमिपूजन; लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती!

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकारातून विकासकामांना गती; भूमिपूजनानंतर ग्रामस्थांसाठी चुलबंद स्नेहभोजनाचे आयोजन!

कळंभे, ता. वाई | प्रतिनिधी
वाई तालुक्यातील समृद्ध ग्रामपंचायत कळंभे व ग्रामस्थ मंडळ कळंभे यांच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तब्बल ४६ लाख ७५ हजार रुपये खर्चाच्या विविध ११ विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या विकासकामांमुळे कळंभे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार श्री. मकरंदआबा पाटील, खासदार मा. श्री. नितीनकाका पाटील आणि वाई पंचायत समिती सदस्या मा. सौ. राणीताई पवार यांच्या निधीतून, ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगाच्या निधीतून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल प्राप्त झालेल्या बक्षीस रकमेतून तसेच सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनाच्या रकमेतून या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व खासदार मा. श्री. नितीनकाका पाटील, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रमोददादा शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक मा. श्री. सत्यजितदादा वीर, वाई पंचायत समितीचे सभापती मा. श्री. विक्रांत उर्फ भैय्या डोंगरे, उपसभापती मा. सौ. वर्षाताई जगताप, पाचवड पंचायत समिती गणाच्या सदस्या मा. सौ. राणीताई पवार, केंजळ पंचायत समिती गणाचे सदस्य मा. श्री. शैलेशदादा सकपाळ, ओझर्डे गणाच्या पंचायत समिती सदस्या मा. हर्षाताई फरांदे, किसनवीर कारखान्याचे संचालक मा. श्री. रामदास इथापे, मा. श्री. संजय कांबळे, मा. श्री. प्रकाश धुरगुडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा. श्री. आत्माराम नाना सोनवणे, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक मा. श्री. कांतीलाल तात्या पवार, बाजार समितीचे माजी संचालक मा. श्री. राजेंद्र सोनवणे, पाचवडचे माजी सरपंच व नवलाई पतसंस्थेचे चेअरमन संजयबापू गायकवाड, माजी सरपंच मा. श्री. भरत आप्पा गायकवाड, मा. श्री. अनिल शेवाळे, उडतरे गावचे उपसरपंच मा. श्री. मोहनराव पवार, बावधन गावचे प्रगतशील शेतकरी व युवा नेते मा. श्री. हिंदुरावनाना पिसाळ-पाटील, श्री. विजय शिंगटे (खडकी) यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कळंभे गावच्या प्रथम नागरिक, आदर्श सरपंच व राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच सौ. निलम शिवथरे, राष्ट्रीय उत्कृष्ट उपसरपंच सौ. शकुंतला चव्हाण, राष्ट्रीय सक्षम व उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी मा. श्री. रघुनाथ भोईर, कळंभे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मा. श्री. यशवंत आबा शिवथरे, मानाई पतसंस्था कळंभेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. विनायकतात्या गोगावले, माजी सरपंच व राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच सौ. ज्योती गायकवाड, राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच सौ. सारिका गायकवाड, माजी उपसरपंच श्री. आबाजी सुतार, माजी उपसरपंच श्री. प्रकाश बाबर, महात्मा गांधी महिला तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा सौ. सीमा जाधव, नवलाई पतसंस्था पाचवडचे संचालक व उद्योजक मा. श्री. प्रदीप शिवथरे, श्री. दत्तानाना गायकवाड यांची उपस्थिती होती.
तसेच स्व. लक्ष्मणराव पाटील तात्या, नामदार आबा व काका यांच्यावर प्रेम करणारे गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, माता-भगिनी, तरुण कार्यकर्ते, महिला बचतगटांच्या सदस्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर समृद्ध ग्रामपंचायत कळंभे यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांसाठी चुलबंद स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहभोजनाच्या माध्यमातून गावातील एकोपा, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींचा निधी, ग्रामपंचायतीचे नियोजन, पदाधिकाऱ्यांचे योगदान आणि ग्रामस्थांची एकजूट यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. ११ विकासकामांच्या माध्यमातून कळंभे गावाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
RPS STAR NEWS विशेष
“निधीचा योग्य विनियोग, विकासाचा ध्यास आणि ग्रामस्थांची साथ… कळंभे गावाने दाखवला समृद्ध ग्रामविकासाचा आदर्श मार्ग!”

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button