श्रीगोंदा:-विसापूरच्या आवर्तनासाठी आ. विक्रम पाचपुते यांचा पाठपुरावा!
पत्रकार राधाजी व्यवहारे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीगोंदा:-विसापूरच्या आवर्तनासाठी आ.विक्रम पाचपुते यांचा पाठपुरावा!

ना.विखे पाटलांना निवेदन; शेतकऱ्यांनी संयम ठेवण्याचे आवाहन.
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आवर्तन सोडण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या प्रश्नावर आमदार विक्रम पाचपुते यांनी सक्रिय पाठपुरावा सुरू केला असून, त्यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
विसापूर परिसरातील शेतकरी पाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. पिके वाचवण्यासाठी आवर्तन तातडीने सोडणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मंत्री महोदयांसमोर मांडताना आ. पाचपुते यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.
यावेळी बोलताना आ. पाचपुते म्हणाले, “शेतकऱ्यांनी संयम ठेवावा. आंदोलनात्मक पाऊल उचलून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. मी स्वतः या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”
विसापूरच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडेही विनंती करणार असल्याचे आ. पाचपुते यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निवेदनानंतर शेतकऱ्यांमध्ये आवर्तनाबाबत आशा निर्माण झाली असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



