क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुसेसावळीत अवैध गुटखा विक्रीला कोणाचे अभय?

पत्रकार शाहरुख बागवान खटाव तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुसेसावळीत अवैध गुटखा विक्रीला कोणाचे अभय?

प्रतिनिधी…. शाहरुख बागवान..

खुलेआम विक्री सुरू असल्याची चर्चा; संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

पुसेसावळी : राज्यात गुटखा विक्री आणि साठवणुकीवर बंदी असतानाही पुसेसावळी परिसरात अवैध गुटखा विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. बंदी असलेल्या गुटख्याची विक्री नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गुटख्याच्या अवैध विक्रीतून तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असून, सार्वजनिक आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असताना अशा प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागांकडून ठोस कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

पुसेसावळी परिसरात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि पुरवठा नेमका कुठून होतो? या व्यवसायामागे कोणाचे जाळे कार्यरत आहे? विक्रेत्यांना कोणाचे पाठबळ आहे? या बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संशयित ठिकाणी तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अवैध गुटखा विक्रीला आळा बसणार की कारवाई केवळ कागदावरच राहणार? असा सवाल आता पुसेसावळीकरांकडून उपस्थित केला जात आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Back to top button