वाई:-‘किसन वीर’चे माजी विद्यार्थी डॉ. केशव राजपुरे यांचा विद्यापीठ स्तरावर गौरव – संस्थाध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केला सत्कार.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-‘किसन वीर’चे माजी विद्यार्थी डॉ. केशव राजपुरे यांचा विद्यापीठ स्तरावर गौरव – संस्थाध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केला सत्कार.

वाई : दि. २६ नोव्हेंबर २०२६
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. (डॉ.) केशव यशवंत राजपुरे यांना शिवाजी विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल किसन वीर महाविद्यालय, वाई येथे त्यांचा संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. राजपुरे हे किसन वीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयात विशेष अभिमान आणि आनंद व्यक्त करण्यात आला.
त्यांचा सत्कार करताना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले म्हणाले, आपल्या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन विद्यापीठस्तरावर शिक्षक आणि संशोधक म्हणून उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या माजी विद्यार्थ्याचा सन्मान हा संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे. राजपुरे सरांचा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसाठी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि ज्ञानाच्या साधनेतून यश मिळविण्याचा प्रेरणादायी आदर्श असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य डॉ. विनोद वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
किसन वीर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने आपल्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि अध्यापन क्षेत्रातील कार्यातून प्राप्त केलेला हा गौरव महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत मानाचा ठरला असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ. केशव यशवंत राजपुरे यांचे मूळ गाव अनपटवाडी (बावधन), ता. वाई असून, त्यांनी १९८७ ते १९८९ या कालावधीत किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत त्यांनी ८२ टक्के गुण प्राप्त करून विज्ञान शाखेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. विद्यार्थिदशेतच त्यांनी दाखविलेली शैक्षणिक गुणवत्ता, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य त्यांच्या पुढील यशस्वी शैक्षणिक व संशोधनात्मक प्रवासाचा पाया ठरले.
शिक्षण, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राजपुरे यांनी Thin Film Materials, Solar Cells, Materials Science, Gas Sensors, Photoelectrochemistry आणि Water Purification यांसारख्या संशोधन क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अनेक संशोधन लेख, संशोधन प्रकल्प, पेटंट आणि पीएच.डी. संशोधकांना मार्गदर्शन या माध्यमातून त्यांनी संशोधन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचे शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विद्यार्थी मार्गदर्शनात्मक कार्य अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि नवोदित संशोधकांसाठी प्रेरणादायी आहे.




