आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-ज्योतिष शास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे – माजी आयुक्त चंद्रकांत दळवी.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपर्क प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

ज्योतिष शास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे – माजी आयुक्त चंद्रकांत दळवी.

मायणी प्रतिनिधी__ज्योतिष शास्त्र हे फार प्राचीन शास्त्र असून ग्रहतारे खगोलशास्त्र यांच्याशी ते निगडित आहे ज्यांना अनेक वर्षाचा अभ्यास व्यासंग चिंतन संशोधन आहे.

ज्यांनी

अनेक पत्रिका पाहिले आहेत ते अनेक प्रश्नांची उत्तरे सहज देऊ शकतात मात्र यामध्ये अंधश्रद्धा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे मत माजी महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पुणे येथे बोलताना व्यक्त केले यावेळी ज्योतिषाचार्य रमणलाल शहा चंद्रकांत शेवाळे नंदकिशोर जकारदार शिरीष चिटणीस नवीन कुमार शहा विजय जकातदार संजय इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती पुणे येथील टिळक स्मारक मंदिर येथे प्राचार्य यांची ज्योतिष कार्यशाळा होती या कार्यशाळेत दळवी बोलत होते आपल्या भाषणात चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की राम णलाल शहा यांचे वय 89 असून या वयात ते दहा तास अभ्यास करतात ज्योतिषा बरोबर त्यांनी साहित्य क्षेत्रातील अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहे त्यांच्या पुस्तकांना आज देशातून विदेशातून मागणी होत आहे यावेळी त्यांनी लिहिलेल्या ज्योतिष शास्त्राच्या नियमात जगातील असंख्य व्यक्ती व ज्योतिष शास्त्राची प्रचिती या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आपल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना रमणलाल शहा यांनी सांगितले की ज्योतिषांनी चिंतन अभ्यास म्हणून संशोधन आणि हजारो पत्रिकांचे वाचन केल्यानंतर आपणाला घटना कधी घडणार आहे हे सांगता येते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारे हे शास्त्र असून हे शास्त्र प्राचीन शास्त्र आहे प्रत्येकाच्या पत्रिकेत असंख्य गोष्टी लपलेल्या
असतात या गोष्टीची जाणीव ज्योतिषाने असणे गरजेचे असते यावेळी त्यांनी अनेक नेत्यांच्या पत्रिका आणि घटना यांचा समन्वय साधला याप्रसंगी ज्योतिषशास्त्रात बहुमोल कामगिरी बजावलेल्या सौ जयश्री बेलसरे पुष्पलता शेवाळे मालती शर्मा गौरी केंजळे सापदे श्रीधर कुलकर्णी नंदकुमार जोशी पद्मा कासट श्रीधर कुलकर्णी श्रीराम देव गोविंद कोष्टी सपना पवार उषाताई कांबळे महेश कुलकर्णी संदीप फडके विजय जकातदार नंदकिशोर जकातदार दीपक कोपरगट्टीकर रजनी सापदे अमोल कुपटीकर अशा असंख्य ज्योतिष शास्त्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा ज्योतिषाचार्य म्हणून गौरव करण्यात आला शेवटी नंदकिशोर जकातदार यांनी आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button