ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-जात राजकारण विरहित कोळे सरपंच पदी मुस्लिम मातेला संधी.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
जात राजकारण विरहित कोळे सरपंच पदी मुस्लिम मातेला संधी.

सत्ता, संपत्ती व अधिकार आपल्या जातीतील नव्हे तर घरातील लोकांना मिळावा असे राजकारण सुरू आहे. त्याला मुळासकट उपटून टाकण्याचा प्रयत्न कराड तालुक्यातील कोळे सरपंच पदी नियुक्ती करताना झाला आहे. मुस्लिम माता लतीफा अमानुल्ला फकीर
यांची सरपंच बिनविरोध निवड झाली आहे.
इंग्रजीच्या काळात १९३३ साली कोळे ग्रामपंचायतींच्या स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत विविध जाती धर्मातील लोकांनी पदे भूषवली.पण,इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुस्लिम समाजाला सरपंचपद मिळाले असल्याने सर्वानाच
आनंदाचे झाला आहे.
महाराष्ट्र राज्यातील माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस युवा नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाची सत्ता कोळे ग्रामपंचायतीमध्ये आहे. स्वर्गीय
लोकनेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे निकटवर्ती, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कै. मन्सूर फकीर यांच्या लतिफा फकीर या वहिनी तर दैनिक लक्ष्मीपुत्रचे संपादक सुलतान फकीर
यांच्या यांच्या मातोश्री आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी पोतदार यांनी कोळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लतीफा फकीर यांची
बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करून त्याचे स्वागत व अभिनंदन केले. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात तळागाळापर्यंत हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकोपा निर्माण झाला आहे. त्याचे फलित म्हणजे ही निवड मानली जात आहे.
दुसऱ्या बाजूला काही कट्टर मनुवादी विचारांचा पगडा असलेल्या संघटना जातीय द्वेष पसरवीत आहेत. प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे साडे चारशे वर्षांपूर्वी एका मुस्लिम मावळ्यांनी दिलेल्या वाघनखे अफजलखान यांच्या पोटात खुपसली व त्यांचा कोतळा बाहेर काढला. हे सांगितले जाते. पण, त्याच वेळी स्वराज्य द्वेष करणारे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी हल्ला केला म्हणून त्यांचे ही मुडंक उडविले. हे सुद्धा घडले आहे. हे आता नव पिढीला इतिहास समजू लागला आहे. कोळे ग्रामस्थांनी खरी क्रांती केली आहे. त्या भूमीला व ग्रामस्थांना मनापासून वंदन करून त्यांचे आभार मानतो. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अमर गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, इम्रान बागवान, महाराष्ट्र शाहीर शाहबुद्दिन कादर शेख,अमोल गंगावणे मिलिंद कांबळे, अन्वर पाशा खान, जावेद खान यांनी दिली आहे. दरम्यान, सरपंच लतिफा फकीर यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
—————————————————
फोटो – कोळे सरपंच लातिफा शेख यांचे अभिनंदन करताना मान्यवर (छाया – निनाद जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button