राहता:-(तिसगाव -प्रवरा)-तिसगाव प्रवरा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बालदिंडी उत्साहात साजरी.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
तिसगाव प्रवरा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बालदिंडी उत्साहात साजरी.
राहता तालुका
तिसगाव येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे विठू माऊलीचा गजर करत बालदिंडी काढून विठू माऊली चे दर्शन घेतले. याप्रसंगी बालदिंडीमध्ये बाल गोपाळांना विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती. त्यामुळे परिसर भक्तीमय झाला होता. सर्व विद्यार्थ्यांनी मंदिरातील प्रति पंढरपूर असलेल्या चतुर्भुज मूर्ती विठ्ठल रुक्मिणी देवतांचे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सौ मते मॅडम व त्यांचा सर्व शिक्षक वृंद तसेच
प्रवरा माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक श्री तुपे सर व त्यांचा सर्व शिक्षक वृंद तसेच प्रवरा माध्यमिक विद्यालय स्कूल कमिटीचे अध्यक्ष माननीय गंगा मामा घुले
त्याचप्रमाणे
*डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अण्णासाहेब मुरलीधर पाटील कडू*
शिवाजी पाटील खर्डे शांताराम पाटील डोंगरे ज्ञानेश्वर कडू पाटील सर्व तिसगाव ग्रामस्थ व तिसगाव भजनी मंडळ बाल दिंडीच्या यशस्वी ते साठी परिश्रम घेतले
आज या बालदिंडीसाठी प्रवरा माध्यमिक विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष श्री गंगा मामा घुले यांनी दोन कॅरेट केली व वेनुनाथ विष्णू पाटील कडू यांनी राजगिरा लाडू भाविकांना प्रसाद दिला
या सर्व बाल दिंडीचे नियोजन आमचे मित्र श्री रामदास काळे सर यांनी छान प्रकारे नियोजन केले त्याबद्दल तिसगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या अभिनंदन केले.