ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी बायपास रस्त्याचे काम अखेर मार्गी

प्रतिनिधि:- दिलीप पुस्तके

मायनी बायपास रस्त्याचे काम अखेर मार्गी डॉक्टर दिलीप येळगावकर प्रतिनिधी यांनी मल्हारपेठ पंढरपूर रस्ता मायनी पेठेतून जातो त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते ही कोंडी होऊ नये म्हणून येथील ग्रामस्थांनी नदीच्या जवळून रस्ता तयार केला रस्ता सुरू झाला पण या रस्त्यावर प्रचंड धुरळा असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले हा रस्ता ताबडतोब व्हावा यासाठी 2018-19 पासून मी प्रयत्न करीत आहे अखेर या प्रयत्नाला यश आले असल्याची माहिती डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की हा रस्ता कॉंक्रिटचा करायचा पण हा रस्ता कोणाच्या मालकीचा हा प्रश्न निर्माण झाला पाटबंधारे महसूल की गावठाण निर्माण झाला त्यावेळी मायनी दिगंची हायवेचे काम सुरू होते त्या ठेकेदाराला हा रस्ता 13 मीटर रुंद 1100 मीटर लांब हा रस्ता करून द्या अशी विनंती केली परंतु त्या काळी सन 2020 मध्ये अतिवृष्टी झाल्याने सरकारने नदीकाठच्या रस्त्याचे सर्वेक्षण करून ब्ल्यू लाईन रेड लाईन असे रेखांकन केली ब्ल्यू लाईन म्हणजे रस्त्यावर पाणी येणार नाही आणि रेड लाइन म्हणजे नदीचे पाणी रस्त्यावर येणार सदरचा रस्ता आम्ही खाजगी कंपनी कडून सर्वे करून घेतला त्यामध्येही काही त्रुटी निघाल्या त्या त्रुटी दुरुस्त करून घेतल्या अखेर हा रस्ता महसूल विभागाने सर्वे नंबर 26 98 पोट खराब रस्ता .77 हेक्टर हा रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे आता पावसाळी अधिवेशनात या रस्त्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर होऊन नदीच्या पात्राचे खोलीकरण संरक्षक भिंत तेरा मीटरचा रस्ता ड्रेनेज पाईपलाईन सह रस्ता सुसज्ज होईल आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या रस्त्याबाबत अभिवचन दिले होते ते आम्ही पूर्ण करणारच अशी ग्वाही डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या वेळी सरपंच सचिन गुदगे व कार्यकरते उपस्थित होते

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button