आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

चेन्नई:-मराठी पाऊल पडते पुढे : तमिळींच्या स्वयंपाकगृहात मालवणी खाद्यपदार्थ!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

मराठी पाऊल पडते पुढे : तमिळींच्या स्वयंपाकगृहात मालवणी खाद्यपदार्थ!

· चेन्नईत मालवणी पदार्थांचा पंचतारांकित महोत्सव संपन्न!

· ‘चैतन्य’ खाद्यगृहाच्या सुरेखा वाळके आणि नितीन वाळके, सायली वाळके, शेफ प्रथमेश कुलकर्णी यांचा सहभाग!

चेन्नई, अण्णा सलाई (सां. प्र.) : आपल्याला मुंबई – महाराष्ट्रात जगभरातील खाद्यपदार्थांची रेलचेल पाहण्यास मिळते. अनेक खाद्य-संस्कृती, परंपरा आपण स्वीकारत असल्याने जिभेवर रेंगाळणारे अद्भुत चवदार पदार्थ महाराष्ट्रात उपलब्ध होत असतात. परंतु आपले मराठमोळे खाद्य पदार्थ इतर राज्यात अभावानेच चाखायला मिळतात. नुकताच तमिळनाडूतील ‘रेन ट्री’ या चेन्नईतील प्रसिद्ध पंचतारांकित रेस्तराँमध्ये आपल्या मालवणी खाद्यपदार्थांचा ७ दिवसांचा खाद्यमहोत्सव आयोजित करून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा सन्मान केला आहे. महाराष्ट्रासाठी आणि खासकरून कोकण-मालवणसाठी अभिमानाची गोष्ट असून मुंबई – मालवण येथील ‘चैतन्य’ या अस्सल मालवणी खाद्यगृहाच्या सौ. सुरेखा वाळके आणि नितीन वाळके, सायली वाळके, प्रथमेश कुलकर्णी यांना हे श्रेय जाते. मालवणी खाद्य पदार्थांचा नुसता महोत्सव न करता आपले पदार्थ कसे बनवावेत? आणि कसे सर्व्ह करावेत? याचे प्रशिक्षणही तेथील प्रशिक्षित शेफना देऊन ते तमिळींना मालवणी पदार्थांचा लळा लावण्यात यशस्वी झाले आहेत.

मालवण ते मुंबई असा प्रवास करत घरगुती जेवणाला अस्सल मालवणी ते Authentic Malvani Cuisine अशी ओळख निर्माण करण्यापर्यंतची मजल सौ. सुरेखा वाळके आणि नितीन वाळके या खाद्यप्रेमी दाम्पत्याने मारत ‘चैतन्य’ची ३० वर्षांपूर्वी स्थापना केली. आज यात एक नाविन्यपूर्ण गोष्टीची भर पडली आहे. चेन्नईच्या ‘रेन ट्री’ हॉटेल मध्ये तमिळ खाद्यप्रेमींसाठी आपल्या अस्सल चवीच्या मालवणी खाद्यपदार्थांच्या खास रेसिपी या महोत्सवात चैतन्य ग्रुपच्या वाळके परिवाराने सादर तर केल्याच परंतु तेथील प्रशिक्षित शेफना आपले पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले. एक आठवडाभर संपन्न झालेल्या या महोत्सवाला खाद्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. तमिळींनी नुसते आपले खाद्य पदार्थच स्वीकारली असे नसून त्यांनी आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दलही कमालीचा आदर असल्याचे दिसून आले.

The Taste of Malvan या सध्या सुरु असलेल्या सात दिवसांच्या या मालवणी खाद्य महोत्सवामध्ये POP-up पद्धतीच्या कार्यक्रमात सेट मेनू म्हणजेच थाळी व बुफे अश्या दोन्ही तऱ्हेने चेन्नईचे खाद्य रसिक मालवणी जेवणाचा आस्वाद घेत होते. मालवणी मसाल्यातील बटाटे वडे ते ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी ते माश्याच तिखलं, आमटी, भाजलेले मासे, भरलेले पापलेट, कोळंबी भात ते चिकन सागोती, वडे, भाकरी आणि मालवणी जेवणाची भैरवी सोलकढी अशी रेलचेल असलेलं चविष्ट पदार्थ खाऊन ते तृप्त झाले. तमिळी अस्सल खवय्यांचा मिळालेला प्रतिसाद मालवणी खाद्यपदार्थांचा लौकिकार्थाने सन्मान वाढवत असून परराज्यातील खवय्यांना तृप्त करण्याची ‘चैतन्य’ला संधी प्राप्त झाली हा अनुभव परकाया प्रवेशासारखा होता असे सुरेखा वाळके सांगतात.

प्रसिद्धी जनसपंर्क प्रमुख : राम कोंडीलकर (राम पब्लिसिटी, मुंबई)

इमेल : ramkondilkar.pr@gmail.com

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button