ताज्या घडामोडी

सातारा:-प्रा शिक्षक बँकेच्या महिला चेअरमन पदासाठी शताब्दी महोत्सवानंतर यश.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

प्रा शिक्षक बँकेच्या महिला चेअरमन पदासाठी शताब्दी महोत्सवानंतर यश.

सातारा दि: शिक्षणमाता सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यात क्रांती झाली आहे .प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी सौ. निशा राजेंद्र मुळीक यांची बँकेच्या शताब्दी महोत्सवानंतर निवड झाली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीचा येथोचित सत्कार झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा किरण यादव यांनी दिला होता. त्यापूर्वीच काही संचालकांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून हा विश्वास ठराव मंजूर केला. त्यानंतर प्राथमिक शिक्षक बँकेच्या कारभारात भ्रष्टाचाराचा आरोप करणारे एकमेकांच्या सोबती येऊन त्यांनी पुन्हा नव्याने आपला डाव मांडला. परंतु ,चेअरमन पदासाठी नाराजी नाट्य घडल्यामुळे अखेर सौ निशा राजेंद्र मुळीक यांना चेअरमन पदी निवड करण्याचे एक मताने ठरले. नूतन चेअरमन सौ निशा मुळीक यांचे पती राजेंद्र मुळीक यांनाही त्याबाबत मनस्वी आनंद झाला आहे. आज अनेक मान्यवरांनी प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन दालनात येऊन नूतन चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राथमिक शिक्षक बँकेच्या प्राथमिक शिक्षक संघ, समिती व इतर प्राथमिक शिक्षक संघटनेने सहकार्य केल्यामुळेच बँकेच्या शताब्दी वर्षानंतर महिला शिक्षक संचालकांना चेअरमन पदाची संधी मिळाली आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या पारदर्शक कारभार यापुढेही कायम ठेवला जाईल. बँकेच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून एका महिला चेअरमन कारकिर्दीमध्ये बँकेच्या प्रगतीचा वेग वाढवण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. फलटण तालुक्यातील तरफ येथे त्या प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पती राजेंद्र मुळीक यांची खंबीर साथ मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी बँकेचे सर्व संचालक, शिक्षक संघटनेचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी सौ. निशा मुळीक यांची निवड झाल्याने सर्वांना मनस्वी आनंद झाला. तसेच कोणत्याही स्वरूपाचा अतिरेक न करता ही निवडणूक शांततेत पार पाडली. त्याबद्दल सर्व सभासदांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानले. यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजी खाडे व बँकेचे अधिकारी उपस्थित होते………………………….. फोटो -प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्यानंतर आनंद साजरा करताना चेअरमन निशा मुळीक व राजेंद्र मुळीक (छाया- अजित जगताप सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button