*भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षक पदी श्री.प्रवीण सावंत यांची निवड*
प्रतिनिधि:- अशितोष चव्हाण

*भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षक पदी श्री.प्रवीण सावंत यांची निवड*
सातारा जिल्हालाच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र पोलीस यांना अभिमान वाटेल अशी गोष्ट अतिशय सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या प्रवीण सावंत याची इराक येथे होणाऱ्या स्पर्धे साठी भारतीय तिरंदाजी संघांचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. त्याचे मुळ गाव लिंब असून सध्या ते सातारा पोलीस मध्ये कार्यरत असून दृष्टी आर्चरी अकॅडमीचे मानद प्रशिक्षक व सातारा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मध्ये धनुर्विद्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत..अकॅडमी च्या माध्यमातून राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खुप खेळाडू घडवले जात आहेत. सावंत सर स्वतः नॅशनल चॅम्पियन असल्याने त्यांचा खुप अनुभव आहे. इराक येथे होणाऱ्या जूनियर एशिया कप स्पर्धेमध्ये प्रवीण सावंत यांनी घडविलेले दोन खेळाडू आदिती गोपीचंद स्वामी व प्रथमेश भालचंद्र फुगे हे सहभागी होणार आहेत..तरी त्यानच्या पुढील वाटचालील खुप खुप शुभेच्छा..