
भोंगा ….२२/४/२२
हिंदू- मुस्लिम एकतेच बनवडी गाव
कोरोना गेला , उत्तर प्रदेशची निवडणुक झाली , युक्रेनचं युद्ध झालं , नेत्यांची लफडी झाली आता या मिडीया वाल्यांना नवा विषय मिळाला आहे , “भोंगा “ या भोंगा विषयाच्या मुळाशी जान्याचा प्रयत्न ,
काही दिवसापुर्वी मी बनवडी ( ता. कोरेगाव , जि – सातारा ) गावात पाहुण्यांच्याकडे गेलो होतो , या गावात निम्मे हिंन्दु व निम्मे मुस्लिम बांधव राहतात , मज्जिद आणि हणुमानाचं मंदिर बाजु बाजुला आहे , या ही मिशिदीवर भोंगा आहे दिवसातुन ३ वेळा हा आजान साठी वाजतो. बाजुच्या मंदिरात ही काकड आरती , भजन लाॅउडस्पिकर लावुन केली जाते , पण ना अजान साठी वाजलेल्या भोंग्याचा कुनाला त्रास आहे ना काकड आरती साठी वाजलेल्या लाॅउडस्पिकरचा , गावातील अनेकांशी मी बोलन केलं पण कुठेच निगेटिव्ह स्वर नव्हता , उलट सर्व जन एकतेचे दाखले देत होते , कोनी म्हणत होतं ते आमच्या सनात सहभागी होतात आम्ही त्यांच्या सनात सहभागी होतो , तेवढ्यात यात्रे निमीत्त भरलेल्या हरिनाम पारायन सोहळ्यात सुरू असलेला किर्तन सोहळ्याचा लाॅउडस्पिकर बंद झाला व अजान साठी भोंगा वाजला , आजान संपताच पुन्हा किर्तनाचा स्पिकर सुरू झाला .याचा अर्थ काय ? समजनाऱ्याने समजुन जावे , आम्हाला समाजात द्वेष नाही तर प्रेम हवं आहे, ज्यांना हे बघवत नाही त्या नेत्यांनी स्वतः नाहीतर आपली पोरबाळं अंदोलनात दगड धोंडे , पोलिसांच्या लाट्या काठ्यांचा मार खान्यासाठी पुढे पाठवावित , आम्हाला आता तुमचं एैकुन आपापसात लढन्यात वेळ घालवायचा नाही ,करोनाने आमचं कंबरड मोडलय , ना आमच्या हाथाला काम आहे ना रोजगार त्यासाठी काही करता आलं तर बघा . शेती मालाला भाव नाही , लाईट बिल भरायला पैसे नाहीत , अश्या विषयांकडं तुम्ही लक्ष दिलं तर लय उपकार होतील तुमचे , जाता जाता आमच्या बनवडी करांनी जपलेल्या एकात्मतेस माझा सलाम व मानाचा मुजरा …