आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात.
आज 15 जून शाळेचा पहिला दिवस आमच्या आश्रमशाळेत खूप आनंदात आणि उत्साहामध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
गेली एक महिना शांत असलेल्या शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावरच आकर्षक रांगोळी रेखाटली होती. फुलांची व फुग्यांची सजावट करण्यात आली होती.
सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकाबरोबरच लेखन साहित्य व वसतिगृहासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.भारती मोहिते मॅडम , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.